अंतर्गत सुरक्षांसमोरील आव्हाने…

114

दीनदयाळ प्रेरणा केंद्र आणि परम मित्र पब्लिकेशन्स आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा शुक्रवार २२ एप्रिल रोजी नौपाडा सहयोग मंदिर सभागृहात सायंकाळी ६ वाजता संपन्न झाला. यावेळी प्रसिद्ध लेखक व अभिनेते दीपक करंजीकर यांच्या ‘विघ्न विराम’ व ‘अस्वस्थ सूत्र’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले. या सोहळ्याला खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, प्रवीण दीक्षित ( आय.पी.एस.) निवृत्त पोलिस महासंचालक, प्रा. डॉ. नितीन करमळकर कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अय्यर प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, Who Painted My Money White या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक असे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

प्रवीण दीक्षित ( आय.पी.एस.) निवृत्त पोलिस महासंचालक यांनी अंतर्गत सुरक्षांसमोरील आव्हाने या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले यातील काही प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत…

अंतर्गत सुरक्षा टीकवणे हे भारतासारख्या खंडप्राय देशासमोर फार मोठे आव्हान आहे. भारतावर अनेकदा परकीय आक्रमणे झाली परंतु ही आक्रमणे भारताने अत्यंत यशस्वीरित्या नेस्तनाबूद केली. परंतु परकीय आक्रमकांनी अनेक भारतीयांची हत्या, विध्वंस करत येथील लाखो लोकांना जबरदस्तीने धर्मांतर करायला लावले. इस्लाम व ख्रिश्चन या दोन्ही धर्मांनी धर्मांतर केलेल्या लोकांचा उपयोग करून त्यांच्या माध्यमातून या लोकांची निष्ठा ही भारतापेक्षा, भारताबाहेरील ताकदींना जास्त राहील यासाठी जोरदार प्रयत्न केले आणि हेच प्रयत्न आजही तितक्याच जोमाने सुरू आहेत. दुर्दैवाने स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा येथील राजकीय सत्तेनेही त्याला खतपाणी घातले. भारतात कोणाचेही राज्य असले तरी येथील राज्यकर्ते आपल्याला अनुकूल राहतील यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करण्यात आले. यामागे फोडा आणि राज्य करा हे सूत्र आहे.

भारतातील लोक हे एकसंध राहू नयेत. त्यांनी एकदिलाने प्रयत्न करू नयेत यासाठी या परकीय शक्ती देशातंर्गत धर्म, जात, प्रांत, अनुसुचित जाती-जमाती, महिला, मुले यांचा सर्रास उपयोग करून देशामध्ये सतत अस्वस्थता राहील आणि राज्यकर्त्यांचे लक्ष हे विकासाकडे न लागता या समस्यांचे निराकरण करण्यात खर्ची पडेल याची खात्री केली जाते. जगातील प्रगत समल्या जाणाऱ्या देशांकडे जर आपण पाहिले तर या सर्व देशांनी त्यांचा विशिष्ट धर्म हा देशाचा धर्म म्हणून जाहीर केला आहे आणि या धर्माला अनुकूल अशी धोरणे ठेऊन इतर धर्मियांना ते दुय्यम स्थान देतात. पण भारतात मात्र प्रत्येकवेळी अनेक विरोधी गटांना बरोबर नेण्याची तारेवरची कसरत करावी लागते. ही परिस्थिती प्रवीण दीक्षित यांनी अधोरेखित केली.

खोट्या गोष्टींचा हिरिरीने प्रचार केला

त्यातच भारत हा कधीही एकराष्ट्र नव्हता, आर्य लोक हे भारताच्या बाहेरून आले आहेत येथील मूळनिवासी लोकांवर त्यांनी सतत अत्याचार केले आहेत अशा धादांत खोट्या गोष्टींचा हिरिरीने प्रचार केला जातो. आणि आजही शालेय अभ्यासक्रमांमध्ये मुलांना त्या स्वरूपाचे धडे शिकवले जातात. मुलांना परकीय भाषेत शिक्षण देऊन तुम्हाला परदेशात नोकऱ्या मिळतील असा खोटा आशावाद निर्माण करून खोटा लाखो पालक परवडत नसतानाही मुलांना परकीय भाषेत शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देतात. संस्कृत मिश्रित हिंदीपेक्षा आपण इंग्रजी शिकूया यामुळे आपला विकास होईल असा प्रचारही केला जातो. ज्या मुलांना भारताचा इतिहास भारतीय विचार भारतीय भाषा याचा गंध नाही अशी भारत विरोधी सेना निर्माण करण्याची आपली अहमहमिका लागलेली दिसते. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर या मध्ये फरक पडेल अशी अपेक्षा आहे.

अशा परिस्थितीमध्ये भारत एकसंध कसा ठेवायचा आणि ही जबाबदारी ही केवळ सुरक्षा संस्था किंवा सनदी अधिकारी पार पाडू शकतील का हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. भारतात भारत तोडू इच्छिणाऱ्या त्यात ताकदी प्रशासनातील सर्वोच्च व्यक्ती राजकीय पक्षांचे नेते प्राध्यापक पत्रकार लेखक अशा लोकमानसावर ठसा उमटवणाऱ्या अनेक महत्वाच्या व्यक्तींना विविध प्रकारची लालूच दाखवून समाजामध्ये दुही निर्माण करत असतात. त्याचे जे स्वरूप आपल्याला दिसतं त्यात विविध प्रकारचे आंदोलन, रस्ता रोको कार्यक्रम, लोकांनी निवडून दिलेल्या शासनाला काम करणे अशक्य असेल या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती प्रकाशित झालेल्या ‘विघ्न विराम’ या पुस्तकात आहे. असे प्रवीण दीक्षित यांनी स्पष्ट केले.

यानंतर पेपर सिक्युरिटीबद्दल आपले मत व्यक्त करताना ते म्हणाले, पेपर सिक्युरिटी त्यासंदर्भात भारत सरकार तर्फे माझ्यावरती पासपोर्ट संबंधी महत्वाची कामगिरी सोपविण्यात आली होती. पासपोर्टचा जो पेपर असतो जो नोटांचा पेपर असतो त्याच तो पेपर असतो. हा पेपर एकच कंपनी भारत पाकिस्तानासह तसेच अनेक देशांना पुरवत असते. परंतु जेव्हा नरेंद्र मोदी सत्तेवर आले तेव्हा त्यांनी पहिल्यापासूनच धोरण ठेवले की, पैशांचे युपीआय स्वरूपात Transaction झाले हवेत. नोटबंदीच्या आधीच पंतप्रधान मोदींनी युपीआय लॉंच अॅप लॉंच केले होते. पैशांचा ई-चलनमध्ये उपयोग करा हा बदल मोदींमुळे भारतभर पसरवला हे जगभरातील काही आघाडीच्या देशांना सुद्धा जमलेले नाही आणि याकरता मोदी सरकारचे अभिनंदन करावे तेवढे कमी आहे.

अस्वस्थ सूत्र हे पुस्तक आपण सर्वांनी वाचले हवे

इंडिया टूल किटची प्रचिती आपण गेल्या अनेक वर्षात विविध स्वरूपात घेत आहोत. उदाहरणार्थ सीएए, शेतकरी आंदोलन, कॅनडातून चालवली गेलेली आंदोलने किंवा आपल्या इथे भीमा कोरेगाव सारख्या प्रकणांमध्ये डावे/शहरी नक्षलवादी आपल्याला पाहायला मिळाले. या नक्षलवाद्यांना विकसित देशांकडून फंडिंग केले जाते. सर्व नैसर्गिक संसाधने असूनही आज अफगाणिस्थान मधल्या लोकांचे किती हाल होत आहेत हे आपण पाहतोच आहोत. शेकडो वर्ष त्यांनी भारतावर आमक्रण करून लुटले आणि स्वत: आता दोनशे वर्ष आक्रमणाला बळी पडले आहेत. यासाठी अस्वस्थ सूत्र हे अफगाणिस्थान वरील पुस्तक आपण सर्वांनी वाचले हवे असे त्यांनी सांगितले.

डाव्या आणि देशविरोधी तत्त्वांनी आज अनेक विद्यापीठ आणि महाविद्यालये पोखरलेली आहेत. जेएनयू सारखीच परिस्थिती टाटा इन्सिट्यूट ऑफ सोशल सायन्स, पुण्यामध्ये सुद्धा आहे. याकरता अमेरिकेमध्ये जे अधिकारी सुरक्षा दलातून निवृत्त झाले आहेत अशा व्यक्तींना मुद्दाम प्राध्यापक म्हणून नेमले जाते. ते मुलांच्या लिखाणावरती लक्ष ठेवतात व देशविरोधी काही आढळले तर तातडीने विशेष लक्ष केंद्रित करतात. युजीसीने नुकताच नियमांमध्ये बदल करत जे निवृत्त आयएफएस, आयएएस अधिकारी आहेत ते पीएचडी नसले तरी त्यांना केंद्रीय विद्यापीठांमध्ये काम करण्याची परवानगी दिलेली आहे. याच धर्तीवर अन्य विद्यापीठांमध्ये सुद्धा अनुभवाचा फायदा घेत अशा व्यक्तींना रूजू केले हवे. दुसरा बदल म्हणजे जेव्हा केनेडी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा बारावी उत्तीर्ण झालेल्या अमेरिकन मुलांना जगामध्ये अनेक मुलांना फिल्ड स्टडिजसाठी पाठवण्यात येत असे अगदी त्याचप्रमाणे भारतात सुद्धा भारतीय मुलांना बारावी उत्तीर्ण झाल्यावर फिल्ड स्टडिजची संधी द्यावी व त्यांच्याकडून विशेष अभ्यास करून घ्यावा व अशा यशस्वी मुलांना पुढील शिक्षणासाठी प्राधान्य द्यावे. अशाप्रकारची सूचना प्रवीण दीक्षित यांनी केली आहे.

सरकारच्या या प्रयत्नांना यशस्वी करण्याची आवश्यकता

भारताने एका वर्षात ४०० अब्ज डॉलर्सचा एक्सपोर्टचा टप्पा पूर्ण केला यासाठी अर्थमंत्र्यांचे अभिनंदन केले. हे भविष्यात अजून वाढवावे. गेल्या वीस वर्षात अफगाणिस्थान दहशतवादाचे केंद्र म्हणून निर्माण झाले आहे. अमेरिकेने तेथे आपले सैन्य पाठवले पण तेथील विकासाची कामे एनजीओमार्फत केली जातील असे धोरण ठेवले यामुळे या एनजीओच्या लोकांना संरक्षण देणे यातच अमेरिकन सैन्य अडकून पडले होते. भ्रष्टाचाराच्या नावाखाली शासकीय यंत्रणांना दूर ठेवले गेले यामुळे विकास झालाच नाही व शासकीय यंत्रणाही सक्षम होऊ शकल्या नाहीत.

आत्मनिर्भर भारत नरेंद्र मोदींच्या या संकल्पनेमुळे परदेशी शस्त्रास्त्रे विकणाऱ्या कंपन्यांचे कंबरडे मोडले आहे. गैरकायदेशीर गोष्टींबाबत असणारी आपली उदासीनता सोडून लोकांनीही नरेंद्र मोदी सरकारच्या या प्रयत्नांना यशस्वी करण्याची आवश्यकता आहे. असे सांगत नवनवीन धोरणांबाबत प्रविण दीक्षित यांनी सरकारचे कौतुक केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.