म्हाडाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रवीण राऊतांचा घोटाळा, ईडीचा दावा

118

गोरेगाव येथील भूखंड विक्रीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय उद्योजक प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली आहे. गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी म्हाडाचे काही अधिकारीही ईडीच्या रडारवर आहेत. प्रवीण राऊतने म्हाडाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र लिहिलं होतं आणि खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी परवानगी मागितली होती. ईडीने कागदपत्र पडताळल्यानंतर स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचे पैसे भरलेले आहेत हे स्पष्ट झालं त्यामुळे म्हाडाला व्यक्तिगत विक्रीची परवानगी देताना कोणताही तोटा झाला नाही असे समोर आले आहे. म्हाडाची अधिकृत परवानगी न घेता म्हाडाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून आरोपी प्रवीण राऊतने फ्लॅटसच्या खरेदी विक्रीचा मार्ग मोकळा करून घेतला होता असा दावा ईडीने केला आहे.

ईडीचा आरोप

१ हजार ३४ कोटींच्या गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी म्हाडाचे काही अधिकारी ईडीच्या रडारवर आहेत. या प्रकरणात ईडीकडून म्हाडाच्या अधिकाऱ्यांचेही जबाब नोंदवले जाणार आहेत. प्रवीण राऊत आणि म्हाडाच्या काही अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या कथित व्यवहारप्रकरणी चौकशी होणार आहे. ईडीकडून म्हाडाच्या काही अधिकाऱ्यांची भूमिकाही पडताळली जात आहे. गोरेगाव पत्राचाळ प्रकल्पात आरोपी प्रवीण राऊतने काही फ्लॅट्सची परस्पर विक्री करण्यासाठी म्हाडाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरलं होत असा आरोप ईडीने केला आहे.

( हेही वाचा : ईडीकडून लवकरच बड्या राजकीय नेत्याला समन्स, राज्यातील राजकारणात उडणार खळबळ )

प्रवीण राऊतने म्हाडाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र लिहिलं होतं आणि खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी परवानगी मागितली होती. ईडीने कागदपत्र पडताळल्यानंतर स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचे पैसे भरलेले आहेत हे स्पष्ट झालं त्यामुळे म्हाडाला व्यक्तिगत विक्रीची परवानगी देताना कोणताही तोटा झाला नाही असे समोर आले आहे. म्हाडाची अधिकृत परवानगी न घेता म्हाडाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून आरोपी प्रवीण राऊतने फ्लॅटसच्य् खरेदी विक्रीचा मार्ग मोकळा करून घेतला होता असा दावा ईडीने केला आहे. गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने ७ बिल्डर्सला फ्लॅट्सचे FSI विकले आणि त्यातून १ हजार ३४ कोटी कमावले. शिवाय गोरेगाव पत्राचाळ प्रकल्पातील काही फ्लॅट्सची विक्री करण्याच्या नावाखाली ४५८ ऍडव्हान्स बुकिंग करण्यात आले त्यातून १३८ कोटी कमवण्यात आले असे ईडीने स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.