मान्सूनपूर्व पावसाचा मुंबईत लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. ठाणे ते वाशी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बर सेवा ठप्प आहे तर पावसामुळे दिवा रेल्वे स्थानकातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे.
( हेही वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कसा निश्चित केला जातो? जाणून घ्या कसा होणार फायदा)
प्रवाशांची गैरसोय
दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. दिवा स्थानकातील वीज पुरवठा खंडीत झाला असून, मध्य रेल्वेच्या गाड्या जवळपास १० ते १५ मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे.
सायंकाळी ७.१५ पासून ठाणे ते वाशी मार्ग बंद आहे. वाशी आणि सानपाडा स्टेशन दरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्यामुळे ट्रान्सहार्बर मार्ग ठप्प झाला आहे. मात्र, ठाणे – पनवेल आणि ठाणे जुईनगर हा मार्ग सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना वाशीला जायचे असेल तर त्यांना जुईनगरला उतरून जावे लागणार आहे. रेल्वे अधिकारी/ कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असून लवकरात लवकर सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community