आता Free मध्ये मिळणार VIP नंबर! ‘ही’ टेलिकॉम कंपनी देतेय ऑफर

145

अनेकांना स्वत:चा मोबाईल नंबर हा युनिक किंवा लक्षवेधी हवा, असे वाटत असते. व्हीआयपी मोबाईल नंबर असे असतात की, ते इतर नंबर प्रमाणे नसून जे सहज लक्षात ठेवता येतात. मात्र, असे आकडे बाजारात सहजा-सहजी मिळत नाहीत. यासाठी लिलाव केला जातो किंवा त्या युनिक नंबरसाठी मोठी किंमत मोजावी लागते. तर अनेक टेलिकॉम कंपन्या व्हीआयपी मोफत विकतात. याशिवाय व्हर्च्युअल व्हीआयपी मोबाइल नंबरही ऑनलाइन खरेदी करता येणार आहे. अनेक वेबसाइट व्हर्च्युअल व्हीआयपी मोबाइल नंबर विकतात. मात्र, त्यासाठी ते काही पैसे देखील आकारतात.

(हेही वाचा – मुकेश अंबानींना दिला रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा)

प्रीमियम क्रमांक म्हणजेच व्हीआयपी बीएसएनएलद्वारे देखील खरेदी केले जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला लिलावात सहभागी व्हावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला eauction.bsnl.co.in वर नोंदणी करा. यानंतर तुम्ही व्हीआयपी नंबरच्या यादीतून कोणत्याही नंबरसाठी बोली लावू शकता.

फ्रीमध्ये मिळू शकतो व्हीआयपी नंबर

तुम्ही स्वतःसाठी व्हीआयपी मोबाईल नंबर देखील मोफत मिळवू शकता. त्याची सुविधा दूरसंचार कंपनी Vi ने दिली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइट https://www.myvi.in वर जाऊन यानंतर, तुम्हाला वरच्या बाजूला दिलेल्या पर्यायातून New Connection चा पर्याय निवडावा लागणार आहे. यानंतर अनेक पर्याय उपलब्ध होतील. यामध्ये तुम्हाला व्हीआयपी नंबरचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर गरजेनुसार तुम्ही पोस्टपेड किंवा प्रीपेड नंबर निवडू शकता. यानंतर तुम्हाला एरिया कोड देणं अनिवार्य असणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला तुमचा अॅक्टिव्ह मोबाइल नंबर देखील द्यावा लागणार आहे. यानंतर, Vi कडून व्हीआयपी मोबाईल नंबर तुमच्या घरी थेट पोहोचवला जाणार असून जो तुम्ही नंबर म्हणून वापरू शकता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.