राज्यात पूर्वमोसमी पावसाने सलग दुस-या दिवशी जोर कायम ठेवला. शुक्रवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाचा मारा सुरु होता. मात्र शनिवारी केवळ मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात हलक्या पूर्वमोसमी पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने व्यक्त केली.
( हेही वाचा : बेस्ट उपक्रमाचे वीजग्राहकांना आवाहन! बनावट SMS पासून सतर्क रहा )
मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली माहिती
शुक्रवारी कोल्हापूरात १६ मिमी, सांगलीत २२ मिमी, सातारा आणि महाबळेश्वरातही पावसाची नोंद झाली. कोकणात रत्नागिरीत २ मिमी पाऊस पडला. राज्यात आता पूर्वमोसमी पावसाचा मुक्काम संपत असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या पाच दिवसांच्या पूर्वानुमानात दिसून आले. शनिवारी दक्षिण कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रात सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागांत हलक्या पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. मात्र हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद येथील पावसाच्या हजेरीबाबत मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वेट एण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. विदर्भातही काही भागांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community