राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची लढाऊ ‘सुखोई 30’ मधून ऐतिहासिक सफर; यापूर्वी ‘या’ राष्ट्रपतींनी घेतला होता हा अनुभव

161

स्वतंत्र भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. सभा-समारंभातील त्याची उपस्थिती नेहेमीच सर्वांना एक विशेष आनंद देऊन जाते. भारतीय सैन्यदलासह नौसेना आणि वायुसेना यांच्या प्रमुखपदी असलेल्या राष्ट्रपती जेव्हा येऊन प्रत्यक्ष भेट देतात, तो क्षण सर्व दलांसाठी अविस्मरणीय असतो. ८ एप्रिलला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आसामच्या तेजपूर हवाई अड्ड्यावरुन उड्डाण केले. या प्रसंगी त्या हवाई दलाच्या गणवेशात दिसल्या.

ह्या ऐतिहासिक उड्डाणा विषयी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, “भारतीय वायुसेनेच्या बलाढ्य सुखोई-३० MKI लढाऊ विमानात उड्डाण करणे हा माझ्यासाठी रोमांचक अनुभव होता. ही अभिमानाची बाब आहे की, भारताची संरक्षण क्षमता आता विस्तारली आहे ज्यात जमीन, हवा आणि समुद्राच्या सर्व सीमांच्या रक्षणाचा समावेश होतो.”

राष्ट्रपतींनी सुखोई 30 MKI मधून घेतलेल्या ऐतिहासिक उड्डाणा विषयी..

  • राष्ट्रपतींनी तब्बल ३० मिनिटे उड्डाण केले.
  • राष्ट्रपतींनी ८०० किलोमीटर प्रती तास या वेगाने प्रवास केला.
  • सागर पातळीपासून २०० किलोमीटरवर ह्या विमानाने प्रवास केला.
  • कॅप्टन नवीन कुमार हे वैमानिकाच्या भूमिकेत होते.

सुखोई 30 MKI लढाऊ विमानाची विशेषता 

  • अवघ्या साठ सेकंदात ५७,००० फुटांची उंची गाठण्याची क्षमता या विमानात आहे.
  • गोळ्यांचे १५० राउंड फक्त साठ सेकंदात फायर करू शकते.
  • तासाला १२२० किलोमीटर वेगाने उडते.
  • ब्रह्मोस मिसाईल या विमानाद्वारे शत्रू पक्षावर सोडता येऊ शकते.
  • हे विमान रशियन बनावटीचे आहे.

राष्ट्रपती आसाममध्ये गुरुवारी दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी…

  • ६ एप्रिलला जेव्हा राष्ट्रपती दौपदी मुर्मू आसाममध्ये दाखल झाल्या, तेव्हा त्यांचे स्वागत आसामचे राज्यपाल गुलाब चंद कटारिया आणि मुख्यमंत्री हेमंत बिसवा शर्मा यांनी केले.
  • गुवाहाटी येथील गुवाहाटी उच्च न्यायालयाला ७५ वर्षे पूर्ण झाली. त्या समारंभातही राष्ट्रपती उपस्थित होत्या.
  • काझिरंगा राष्ट्रीय उद्यानातील ‘गज उत्सवा’चे उद्घाटन केले.
  • आसाममधील इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांचे उद्घाटन केले.

या आधी कोणत्या राष्ट्रपतींनी केला होता प्रवास?

  • रामनाथ कोविंद
  • डॉ. एपीजे अब्दुल कलाम
  • प्रतिभा पाटील

(हेही वाचा – उत्तर प्रदेशात होणार ‘महाराष्ट्र भवन’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी करणार घोषणा!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.