राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान!

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मंगळवारी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते परम विशिष्ट सेवा पदक स्वीकारले, तर कॅप्टन आशुतोष कुमार यांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान ते शहीद झाले होते.

( हेही वाचा : यंदाच्या पावसाळ्यात १७ दिवस भरतीचे )

शौर्य चक्र

याशिवाय नायब सुभेदार सृजित एम (17 मद्रास), राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार अनिल तोमर (44 आरआर), पिंकू कुमार (34 आरआर), काशिराय बम्मनल्ली (44 आरआर) आणि शिपाई जसवंत रेड्डी (17 मद्रास) यांना त्यांच्या शौर्याबद्दल मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here