Israel Hamas War : तुमच्या प्रियजनांची आम्ही लवकरात लवकर भेट घडवून आणू; नेतान्याहू यांचे आश्वासन

पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिले पीडितांच्या नातेवाइकांना वचन

183
Israel Hamas War : तुमच्या प्रियजनांना आम्ही लवकरात लवकर भेटवू...

पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Israel Hamas War) यांनी रविवारी १५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी हमासच्या हल्ल्यातील बेपत्ता आणि बंदिस्त इस्रायलींच्या कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबीयांशी बोलून पंतप्रधानांनी त्यांचे सांत्वन केले.

नेतान्याहू (Israel Hamas War) यांच्या कार्यालयाने ट्विट केले की, पंतप्रधान नेतान्याहू यांनी अटकेत असलेल्या आणि बेपत्ता लोकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पीडितांच्या नातेवाइकांनी नेतान्याहू यांच्यासोबतच्या भेटीनंतर सांगितले की, पंतप्रधानांनी आमच्या प्रियजनांना लवकरात लवकर आम्हाला पुन्हा भेटवण्याचे वचन दिले आहे. त्यांना लवकरच परत आणले जाईल.

शनिवारी तेल अवीवमध्ये एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये बेपत्ता (Israel Hamas War) व्यक्तींच्या एका नातेवाईकाने सांगितले की, माझ्या चुलत बहिणीला तिच्या नऊ महिने आणि चार वर्षांच्या मुलांसह दहशतवाद्यांनी घरातून पळवून नेले. ते सर्व निर्दोष आहेत. हमास ही दहशतवादी संघटना आहे. शक्य तितक्या लवकर त्याला जिवंत परत आणावे अशी आमची इच्छा आहे.

(हेही वाचा – DRI : सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ११ जणांना अटक तर…)

हमासचा कमांडर ठार

इस्रायली वायूदलाने शनिवारी (१४ ऑक्टोबर) रात्री केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये हमासचा टॉप कमांडर बिलाल अल-कदरा ठार झाला आहे. वायूदलाने शनिवारी रात्री गाझा पट्टीतल्या हमासच्या अनेक तळांवर बॉम्बवर्षाव केला. गाजा पट्टीतल्या दक्षिण खान युनिस बटालियनवर केलेल्या हल्ल्यात बिलाल कदरा मारला गेला. बिलाल हा हमासच्या इस्रायलवरील (Israel Hamas War) हल्ल्यामागील सूत्रधारांपैकी एक होता.

बिलालने इस्रायलच्या किबुत्स निरिम आणि निरओज प्रातांत घुसून इस्रायली (Israel Hamas War) नागरिकांची कत्तल केली होती. बिलाल हा अनेक इस्रायली महिलांचं अपहरण करणाऱ्यांपैकी एक होता. बिलाल कदरा हा पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादी संघटनेतही वरिष्ठ पदावर होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.