Narendra Modi : वीर सावरकर विमानतळ टर्मिनलचे पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन

नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीमुळे अंदमान आणि निकोबारमधील कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल.

210
Narendra Modi : वीर सावरकर विमानतळ टर्मिनलचे पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज म्हणजेच मंगळवार, 18 जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोर्ट ब्लेअरमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया सकाळी 9 वाजता विमानतळावर पोहोचतील, तर दीड तासानंतर पंतप्रधान मोदी टर्मिनल इमारतीचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन करतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पंतप्रधान (Narendra Modi) कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 710 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीमुळे अंदमान आणि निकोबारमधील कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल. केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबारला जागतिक दर्जाच्या विमानतळाची भेट मिळणार आहे. यामुळे केंद्रशासित प्रदेशाचा संपर्क सुधारेल.

(हेही वाचा – व्यास क्रिएशन्सतर्फे बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांचा सत्कार; दिमाखात साजरा झाला व्यासोत्सव)

यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होईल…

हे पोर्ट ब्लेअर टर्मिनल बेट केंद्रशासित प्रदेशावर कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. तसेच यामुळे स्थानिक लोकांसाठी रोजगारच्या नव्या संधीही निर्माण होतील. या प्रकल्पात एकूण 40,800 चौरस मीटर क्षेत्रात बांधकाम केले जाणार आहे. नवीन टर्मिनल इमारतीतून दरवर्षी अंदाजे 5 दशलक्ष प्रवाशांना सुविधा पुरवली जाईल. नवीन टर्मिनल सुरु झाल्यानंतर अंदमान आणि निकोबारमधील पर्यटनाला गती मिळेल यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होईल.

वीर सावरकर विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे डिझाईन निसर्गापासून प्रेरित आहे. याचे डिझाईन समुद्र आणि बेट दर्शवणाऱ्या एका शंखाच्या आकाराचे आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.