कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत भारतात चिंता वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली. यामध्ये आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भारताने नव्या स्ट्रेन ओमेक्रॉनची कोरोनी विषाणूची तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेतली आहे, या बैठकीत संबंधीत देशांत प्रवेशावर निर्बंध घालण्याचा आणि संक्रमित देशांच्या नागरिकांची कठोर तपासणी किंवा प्रतिबंध लादण्याचा विचार आहे. याबाबत जगातही चिंता व्यक्त केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटना, जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातही खळबळ उडाली आहे.
या देशांतील प्रवाशांची होणार तपासणी
या नवीन धोक्याची घंटा लक्षात घेता, भारताने आपल्या कोरोना चाचण्यांत वाढ केली आहे. आणि एक यादी तयार करुन त्यात अनेक देशांची नावे जोडली आहेत. या यादीमधल्या देशातील प्रवाशांना आगमनानंतरच्या चाचणीसह अतिरिक्त उपायांचे पालन करावे लागणार आहे. या यादीत दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, इस्रायल, हाँगकाँग, युनायटेड किंगडम यासह युरोपमधील देशांचा समावेश आहे.
शेअर बाजार कोसळले
ओमिक्रॉन कोरोना प्रकाराचा सर्वात मोठा झटका आशियाई बाजारांमध्ये दिसून आला आहे. याचा सर्वाधिक परिणाम जपान आणि चीनच्या बाजारावर होताना दिसत आहे. जपानचा शेअर बाजार Nikkei 225 मध्ये 800 हून अधिक अंकांची घसरण झाली आहे.
जागतिक व्यापार संघटनेची परिषद रद्द
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, ही परिषद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक देशांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे अनेक देशांचे प्रतिनिधी परिषदेला उपस्थित राहू शकणार नाहीत.
(हेही वाचा : बापरे! ‘या’ राज्यात कोरोनाचे थैमान राज्यपालांकडून आणीबाणी घोषित )
Join Our WhatsApp Community