पंतप्रधान नरेंद्र मोदींना मातृशोक : हिराबेन मोदी यांचं निधन; वयाच्या १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

167

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन झाले आहे. मोदींनी ट्वीटरवरून यासंदर्भातील माहिती दिली. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन मोदी यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान मोदींच्या आईचे निधन झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मातृशोक

‘एक तेजस्वी शतक ईश्वराच्या चरणी विलीन झाले’ असे म्हणत पंतप्रधान मोदींनी आईच्या निधनाबद्दल माहिती दिली. त्यांनी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला असे रुग्णालयाने म्हटले आहे. आईच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादकडे रवाना झाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.