Prince Nagendra Singh : एकेकाळी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त असलेले प्रिन्स नागेंद्र सिंह यांच्याविषयी तुम्हाला माहिती आहे का ?

Prince Nagendra Singh हे एक भारतीय वकील आणि प्रशासक होते ज्यांनी १९८५ ते १९८८ पर्यंत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. १९६६, १९६९ आणि १९७५ मध्ये, त्यांना संयुक्त राष्ट्रांच्या असेंब्लीमध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आले.

181
Prince Nagendra Singh : एकेकाळी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त असलेले प्रिन्स नागेंद्र सिंह यांच्याविषयी तुम्हाला माहिती आहे का ?
Prince Nagendra Singh : एकेकाळी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त असलेले प्रिन्स नागेंद्र सिंह यांच्याविषयी तुम्हाला माहिती आहे का ?

प्रिन्स नागेंद्र सिंह (Prince Nagendra Singh) हे एक भारतीय वकील, न्यायाधीश आणि प्रशासक होते. त्यांनी १९८५ ते १९८८ पर्यंत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष म्हणून काम केले. नागेंद्र सिंह यांचा जन्म १८ मार्च १९१४ रोजी डुंगरपूर राज्यामध्ये झाला. त्यांचे वडील डुंगरपूर राज्याचे राजे होते, त्यांचे नाव राजा विजय सिंह पहिले आणि त्यांच्या मातोश्रीचे नाव राणी दवेंद्र असे होते.

(हेही वाचा – Shashi Kapoor: “मेरे पास मां हैं” हा ‘या’ अभिनेत्याचा डायलॉग आजही प्रसिद्ध, वाचा सविस्तर…)

अशी आहे कारकीर्द

त्यांचे शिक्षण सेंट जॉन्स कॉलेज, कॅंब्रिज येथे झाले. ते भारतीय नागरी सेवेत सामील झाले आणि त्यांनी पूर्वेकडील राज्यांसाठी प्रादेशिक आयुक्त म्हणून काम केले. त्याचबरोबर ते भारताच्या संविधान सभेचे सदस्य, भारताच्या संरक्षण मंत्रालयाचे (Ministry of Defence) सहसचिव, परिवहन महासंचालक आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयात विशेष सचिव म्हणून कार्यरत होते. १९६६ ते १९७२ दरम्यान नागेंद्र सिंह हे भारताच्या राष्ट्रपतींचे सचिव होते. त्यानंतर १ ऑक्टोबर १९७२ ते ६ फेब्रुवारी १९७३ पर्यंत त्यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (Election Commissioner of India) म्हणूनही काम पाहिले आहे.

प्रिन्स नागेंद्र सिंग हे एक भारतीय वकील आणि प्रशासक होते ज्यांनी १९८५ ते १९८८ पर्यंत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. १९६६, १९६९ आणि १९७५ मध्ये, त्यांना संयुक्त राष्ट्रांच्या असेंब्लीमध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आले. १९६७ ते १९७२ या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय कायदा आयोगावर (United Nations) अर्धवेळ काम केले आहे.

हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणूनही त्यांनी काम केले. विशेष म्हणजे या न्यायालयात भारतातील चार न्यायाधिशांपैकी ते एक होते. आंतरराष्ट्रीय बार असोसिएशनचे (International Bar Association) सचिव म्हणूनही त्यांची निवड झाली होती. त्यांना (Prince Nagendra Singh) १९३८ मध्ये कामा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि १९७३ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण प्रदान केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.