कैद्याला शिक्षा पूर्ण होण्याआधीच दिले सोडून! नाशिक कारागृहातील अजब कारभार

150
नाशिक रोड येथील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या तीन न्यायबंदीचा शिक्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी आपल्या फायद्यासाठी कारागृहातून सोडून दिल्याचे लक्षात आल्याने कारागृहातील दोन अधिकारीसह एका वरिष्ठ लिपिकावर नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

तुरुंग अधिकारी दोषी 

याबाबत अधिक माहिती अशी की, २०१७ मध्ये नाशिकरोड कारागृहात कार्यरत असलेल्या तुरुंग अधिकारी श्रेणी १ शामराव अश्रूबा गीते, तुरुंग अधिकारी श्रेणी २ माधव कामाजी खैरगे व वरिष्ठ लिपिक सुरेश जयराम डबेराव यांनी कारागृहात शिक्षाबंदी असलेल्या तीन कैद्यांना त्याची शिक्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी आपल्या फायद्यासाठी सोडून कारागृहातून बेकायदेशीर सोडून शासनाची फसवणूक केली. ही बाब कारागृह प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर कारागृह महासंचालक यांनी अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यात दोषी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या आदेशाने तुरुंग अधिकारी सतीश रामचंद्र गायकवाड यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तुरुंग अधिकारी श्रेणी १ शामराव अश्रूबा गीते, तसेच नांदेड जिल्हा कारागृहात कार्यरत असलेले तुरुंग अधिकारी श्रेणी २ माधव कामाजी खैरगे व जालना जिल्हा कारागृहात कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक सुरेश जयराम डबेराव यांच्या विरोधात फिर्याद दिली असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर एम मनतोडे करीत आहे. याबाबत कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांनी दुजोरा दिला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.