अवघ्या दोन दिवसांवर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आला आहे. जगभरातील राम भक्ताला असे वाटते की आपलाही खारीचा वाटा असावा अशी भवन आहे. असाच काहीसा छोटा उपक्रम उत्तर प्रदेशमधील विविध कारागृहात असलेल्या कैद्यांनी राम मंदिर सोहळ्यासाठी योगदान दिले आहे. राम कार्यासाठी आपलाही हातभार लागावा, अशी इच्छा देशवासीयांची आहे. यात कैद्यांनीही आपले योगदान दिले आहे. ५१ हजार दिवे, ४० हजार रामध्वज अयोध्येला पाठवले जाणार उत्तर प्रदेशच्या ७५ जिल्हा कारागृहात बंदिस्त कैद्यांनी प्रभू श्रीरामांवरील श्रद्धेतून ५१ हजार दिवे बनवले आहेत.Ayodhya Ram Mandir)
केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही या राम मंदिरासाठी, प्रभू श्रीरामांसाठी वैविध्यपूर्ण गोष्टी पाठवण्यात येत आहेत. राम मंदिर सोहळ्यासाठी या वस्तू अयोध्येत पोहोचत आहेत. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी होणाऱ्या अभिषेकासाठी तेल-तुपापासून अनेक गोष्टी अयोध्येत पोहोचवल्या जात आहेत. राम कार्यासाठी आपलाही हातभार लागावा, अशी इच्छा देशवासीयांची आहे. यात कैद्यांनीही आपले योगदान दिले आहे. हे सर्व दिवे अयोध्येला पाठवले जाणार आहे. (Ayodhya Ram Mandir)
(हेही वाचा : Ram Mandir Programme Schedule: अयोध्येत २२ जानेवारी रोजी पाच तास चालणार कार्यक्रम; कसे असेल नियोजन)
तसेच कानपूर.फतेहगड आणि इतर कारागृहातील कैद्यांनी रामध्वज तयार केले आहेत. या रामध्वजांची संख्या सुमारे ४० हजार असून, नोएडा तुरुंगातील कैद्यांनी एक हजार एलईडी दिवे तयार करून अयोध्येला पाठवले आहेत. बाराबंकी तुरुंगातील कैद्यांनी भगवी रामनामी झोळी तयार केली आहे. दरम्यान राम मंदिरात स्थापन होणाऱ्या रामलला मूर्तीची पहिली झलक आली आहे. रामललाची मूर्ती गर्भगृहात दाखल झाली आहे. त्यानंतर जवळपास पाच तास हा कार्यक्रम सुरू असणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community