युरोपियन क्लबवरील हल्ल्याचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला हुतात्मा Pritilata Waddedar

137

प्रीतीलता वड्डेदार (Pritilata Waddedar) या भारतातील बंगाली क्रांतिकारक होत्या. त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक चळवळींमध्ये सक्रियपणे भाग घेतला होता. त्यांचा जन्म ५ मे १९११ रोजी चित्तगॉंग येथे झाला. त्यांनी आपलं शिक्षण चट्टोग्राम आणि ढाका येथून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी कलकत्ता येथील बेथुन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि तिथे त्यांनी तत्वज्ञान म्हणजेच फिलॉसॉफी या विषयात डिस्टिंगशनमध्ये पदवी मिळवली. त्यानंतर त्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. बंगालच्या पहिल्या ‘महिला हुतात्मा’ म्हणून त्यांना ओळखलं जातं.

पंधरा क्रांतिकारकांचे नेतृत्व केले 

सुर्यसेन नेतृत्व करत असलेल्या एका क्रांतिकारी गटामध्ये प्रीतीलता (Pritilata Waddedar) सामील झाल्या होत्या. १९३२ साली पहार्टा येथे युरोपियन क्लबवर करण्यात आलेल्या सशस्त्र हल्ल्यामध्ये प्रीतीलता वड्डेदार यांनी पंधरा क्रांतिकारकांचे नेतृत्व केलं होतं. क्रांतिकारकांनी तो क्लब जाळला होता. या हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाला आणि अकरा जण गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी तिथल्या लोकल पोलिसांनी क्रांतीकारकांना अटक केली होती.

(हेही वाचा वयाच्या ९५व्या वर्षांपर्यंत शिखांना मार्गदर्शन केलेले Guru Amar Das)

सायनाईड घेऊन आत्मार्पण केले 

प्रीतीलता वड्डेदार (Pritilata Waddedar) यांनी सायनाईड घेऊन आत्मार्पण केले होते. त्यांनी केलेले हे आत्मार्पण पूर्वनियोजितच होते. त्यांच्या मृतदेहाजवळ एक पत्र सापडलं होतं. त्या पत्रात त्यांनी चट्टोग्राम इथल्या भारतीय रिपब्लिकन आर्मीची उद्दिष्टे लिहून ठेवली होती. त्यासोबतच त्यांनी सुर्यसेन आणि निर्मलसेन या क्रांतिकारकांची नावंसुद्धा लिहिली होती. ते तुरुंगात असतांना त्यांना त्या अनेकदा भेटल्याचं त्यांनी त्या पत्रात लिहिलं होतं. रामकृष्ण बिस्वास यांना इंग्रजांनी फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यांना फाशी होण्याआधी प्रीतीलता वड्डेदार (Pritilata Waddedar) त्यांच्या चुलत बहिणीच्या नावाने त्यांना तुरुंगात भेटायला जायच्या. असंही त्या पत्रात लिहिलेलं होतं. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्या हुतात्मा झाल्या.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.