प्रितिश नंदी (Pritish Nandi) हे भारतीय कवी, चित्रकार, पत्रकार, संसदपटू, प्राण्यांच्यासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि चित्रपट, टीव्हीचे निर्माते आहेत. त्यांनी इंग्रजीमध्ये चाळीस कवितांची पुस्तक प्रकाशित केली आहेत. त्यांनी बंगाली, उर्दू आणि पंजाबी भाषेतील इतर लेखकांच्या कविता तसेच ईशा उपनिषदच्या नवीन आवृत्तीचे भाषांतर केले आहे.
प्रितिश नंदी (Pritish Nandi) यांचा जन्म बिहार राज्यातील भागलपूर येथे बंगाली ख्रिश्चन कुटुंबात १५ जानेवारी १९५१ मध्ये झाला. प्रीतीश नंदी यांचे कवितांचे पहिले पुस्तक १९६७ मध्ये प्रकाशित झाले. १९६० मध्ये आणखी तीन खंड आणि १९७० मध्ये आणखी १४ खंड प्रकाशित झाले. त्यांनी डायलॉग्स कवितांचे मासिक सत्तरीच्या दशकात काढले. जुलै १९८१ मध्ये सॅन फ्रान्सिस्को येथील कवींच्या पाचव्या जागतिक काँग्रेसमध्ये वर्ल्ड अॅकॅडमी ऑफ आर्ट्स अँड कल्चरने प्रितिश नंदी (Pritish Nandi) यांना कवी पुरस्कार प्रदान केला.
ते टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे प्रकाशन संचालक होते. १९८० च्या दशकात इल्युस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द इंडिपेंडेंट आणि फिल्मफेअरचे संपादक होते. ते चित्रकार आहे आणि कॅलिग्राफी आर्टिस्ट देखील आहेत. त्यांनी पीपल फॉर अॅनिमल्स ही भारतातील पहिली प्राणी हक्क स्वयंसेवी संस्था स्थापन केली. या संस्थेच्या सह-संस्थापक मनेका गांधी आहेत आणि सध्या त्या अध्यक्ष देखील आहेत.
त्यांनी १९९३ मध्ये प्रितिश नंदी (Pritish Nandi) कम्युनिकेशन्स लिमिटेड या कंटेंट कंपनीची स्थापना केली. या व्यतिरिक्त त्यांनी कथा आणि नॉन फिक्शनची पुस्तके तसेच संस्कृतमधून शास्त्रीय प्रेम कवितांच्या अनुवादाची तीन पुस्तके लिहिली आहेत. ते महाराष्ट्रातून राज्यसभेवर खासदार होते, शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. १९७७ मध्ये साहित्यातील त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
Join Our WhatsApp Community