पुण्यातील खासगी शाळांनी यंदा फी शुल्क जवळपास २० ते २५ हजार रुपयांनी वाढविले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षात खासगी शाळांनी शुल्कवाढ करणे टाळले. परंतु सर्व सुरळीत झाल्यानंतर आता मात्र जवळपास ६० टक्क्यांहून अधिक खासगी शाळांनी शुल्कवाढ लागू केली आहे. या शाळांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता १० ते १५ टक्के शुल्कवाढ केल्याचे निदर्शनास येते.
( हेही वाचा : आता आकाशातून पहा विलोभनीय कोकण )
आर्थिक भार वाढला
शुल्कवाढीमुळे पालकांवरील आर्थिक ताण वाढला आहे. त्यामुळे पालकांना मुला-मुलींच्या शाळेचे शुल्क देण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव करावी लागत आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांत शाळेचे शुल्क न भरलेल्या किंवा शुल्काची काही रक्कम भरलेल्या पालकांचा आर्थिक भार आणखीनच वाढला आहे. अशा पालकांना उर्वरित शुल्काची रक्कम आणि यंदाचे (शैक्षणिक वर्ष २०२२-२३) शुल्क देखील द्यायचे आहे. त्यामुळे या पालकांना अधिक ओढा-ताण करावी लागत आहे.
राज्य सरकारने कठोर पावले उचलणे अपेक्षित
काही पालकांनी कोरोनाच्या काळात फी शुल्काची केवळ २० ते ३० टक्के रक्कम भरली आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये शाळा सुरू ठेवताना तारेवरची कसरत करावी लागते असे शाळा प्रशासनांचे म्हणणे आहे. तर या शुल्कवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलणे अपेक्षित आहे असे पुण्याच्या पालक संघटनेने स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community