’लिलेरो ढल’ या गाजलेल्या कवितासंग्रहाचे लेखक Priyakant Maniyar

230
प्रियंकांत मणियार (Priyakant Maniyar) हे निरंजन भगत यांच्या शैलीचे प्रमुख कवी मानले जातात. यामध्ये हसमुख पाठक आणि नलिन रावल यांचादेखील समावेश होतो. प्रियकांत मणियार यांचा जन्म २४ जानेवारी १९२७ रोजी विरमगाम येथे झाला. त्यांचे पालक व्यवसायासाठी अमरेली येथून विरमगाम येथे स्थलांतरित झाले होते.
त्यांनी त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण मंडळ येथे झाले. पुढे त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले. याच सुमारास त्यांनी पंखी अने दानो ही पहिली कविता लिहिली आणि ती कुमार मासिकात प्रकाशित झाली. कुमारचे संपादक बच्चूभाई रावत यांच्या आग्रहामुळे ते ’बुध सभा’ या साप्ताहिक साहित्य कार्यशाळेत सहभागी झाली.
बांगड्या बनवणे हा त्यांचा व्यवसाय होता. मात्र ते हळव्या मनाचे कवी होते. मणियार (Priyakant Maniyar) यांनी प्रतीकात्मक कविता लिहिल्या. त्यांचे सात कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. प्रतीक, अशब्द रात्री, स्पर्श, समीप, प्रबळगती, व्योम लिपी, आणि लिलेरो ढल.
लिलेरो ढल हा राधा आणि कृष्णाच्या प्रेमगीतांचा संग्रह आहे.  १९८२ मध्ये या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कात प्राप्त झाला आहे. १९६३ मध्ये त्यांना कुमार सुवर्ण चंद्रक आणि १९७२ मध्ये उमा स्नेहरश्मी हा पुरस्कार मिळाला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.