भारताचा खरा इतिहास लिहिला म्हणून हिंदुत्वनिष्ठ फ्रांसुआ गोतिए यांचे ट्विटर अकाउंट बंद! 

सार्वभौम आणि सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताला व्यक्तीस्वातंत्र्याचे डोस पाजणाऱ्या 'ट्विटर'नेच विचारस्वातंत्र्याचा गळा घोटला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ट्विटरचा हिंदुद्वेष उघडकीस आला आहे.    

फ्रांस येथील मूळ निवासी असलेले हिंदुत्वनिष्ठ, भारतीय इतिहासाचे अभ्यासक, पत्रकार फ्रांसुआ गोतिए यांचे ट्विटर अकाउंट त्यांना कोणतीही पूर्व कल्पना न देता बंद करण्यात आले. त्यामुळे ट्विटरच्या विरोधात आता संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे सध्या #ISupportGautier या हॅशटॅगच्या माध्यमातून ट्विटरवर मोहीम सुरु झाली आहे.

वसाहतवादी यंत्रणेवर आसूड उगारणारे लिहिले पुस्तक! 

गोतिए यांनी ब्रिटिशांच्या वसाहतवाद या अमानवीय यंत्रणेवर आसूड उगारणारे पुस्तक ‘एॅन एन्टायरली न्यू हिस्ट्री ऑफ इंडिया’ (भारताचा एकदम नव्या पद्धतीने लिहिलेला इतिहास) हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीत ५ मार्च रोजी केंद्रीय आरोयमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतरच गोतिए यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले. या पुस्तकाच्या माध्यमातून गोतिए यांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीला आव्हान दिले असून पाश्चिमात्य देशांनी भारताचा इतिहास कशा प्रकारे कलंकित आणि कावेबाजपणे खोटा प्रसारित केला, यावर परखडपणे भाष्य केले आहे. यामुळे नाराज होऊन ट्विटरने गोतिए यांचे ट्विटर अकाउंट बंद केले. हे पुस्तक प्रकाशित करणाऱ्या गरुड प्रकाशनाचे प्रमुख संक्रांत सानू यांनी ट्विटरवरून निषेध मोहीम सुरु केली आहे. सार्वभौम आणि सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताला व्यक्तीस्वातंत्र्याचे डोस पाजणाऱ्या ‘ट्विटर’नेच विचारस्वातंत्र्याचा गळा घोटला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ट्विटरचा हिंदुद्वेष उघडकीस आला आहे, असे सानू यांनी म्हटले आहे.

कोण आहेत फ्रांसुआ गोतिए? 

  • १९५० साली फ्रान्समधील पॅरिस येथे एका उच्चभ्रू कुटुंबात जन्म झाला.
  • उच्च शिक्षण घेतल्यानंतर पत्रकारिता सुरु केली. फ्रान्समधील विविध आघाडीच्या वृत्तपत्रासाठी काम केले.
  • देश-विदेशात भ्रमंती केल्यानंतर त्यांना भारतीय संस्कृती, अध्यात्म या विषयाची आवड निर्माण झाली.
  • श्री अरविंद घोष आश्रमाशी जवळीक निर्माण झाली आणि भारतीय संस्कृती, इतिहासाचा अभ्यास सुरु केला.

गोतिए यांनी लिहिलेली पुस्तके! 

दी वॉंडर द्याट इज इंडिया (१९९४), रीरायटींग इंडियन हिस्ट्री (१९९६), अराईज अगेन, ओ इंडीया (२०००), ए वेस्टर्न जर्नालिस्ट ऑन इंडिया, दी फिरंगीज कॉलम (२००१), इंडियास सेल्फ डिनायल (२००१), ए न्यू हिस्ट्री ऑफ इंडिया (२००८), दी गुरु जॉय (२००८), ए हिस्ट्री ऑफ इंडिया ऍज इट हॅपन्ड, नाॅट ऍज इट हॅज बीन रिटन (२०१३).

त्यांनी केलेले कार्य

  • गोतिए यांनी फाउंडेशन फॉर अॅडवान्समेंट ऑफ कल्चर ऑफ टाईज (FACT) ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून भारतीय इतिहासावर आधारित सचित्र प्रदर्शन बनवले.
  • त्यामध्ये १९९० साली जम्मू आणि काश्मीर येथील काश्मिरी पंडितांचा वंशविच्छेद करण्यात आला. हिंदूंची मंदिरे तोडण्यात आली. त्या सर्व घटनाक्रमांचे त्यांनी वास्तवदर्शी छायाचित्र प्रदर्शन बनवले.
  • औरंगजेबने केलेल्या अत्याचारावर आधारित चित्रप्रदर्शन बनवले.
  • २०१२मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रमी इतिहास दर्शवणारे चित्रप्रदर्शन तयार केले.
  • २०१३मध्ये तिबेट येथे दलाई लामा यांना भेटल्यानंतर भारतातील बौद्ध धर्म, त्याचे महत्व सांगणारे चित्र प्रदर्शन बनवले. देश-विदेशात हे सर्व प्रदर्शन भरवले जाते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here