Prof. Hemant Chopade यांच्या ‘शून्य, एक अनंत प्रवास’ पुस्तकास शासनाचा राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार

67
Prof. Hemant Chopade यांच्या 'शून्य, एक अनंत प्रवास' पुस्तकास शासनाचा राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार
Prof. Hemant Chopade यांच्या 'शून्य, एक अनंत प्रवास' पुस्तकास शासनाचा राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार

राज्य शासनाच्या वतीने उत्कृष्ट ग्रंथांना दिले जाणारे यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यात नांदुरा तालुक्यातील कोळंबा येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. हेमंत चोपडे यांच्या ‘शून्य, एक अनंत प्रवास’ (Shunya – Ek Anant Prawas) या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार अंतर्गत शिक्षणशास्त्र या प्रकारात स्व. कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार जाहीर झाला आहे. (Prof. Hemant Chopade)

( हेही वाचा : Veg Biryani Recipe : हॅाटेलसारखी व्हेज बिर्याणी बनवा घरच्या घरी, वाचा सोप्या टिप्स …

मुंबई येथे दि. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त (Marathi Bhasha Gaurav Din) मुख्यमंत्री, मराठी भाषामंत्री व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. हेमंत चोपडे लिखित ‘शून्य : एक अनंत प्रवास’ या पुस्तकात शून्य या आकड्याचा अभ्यास मांडण्यात आला आहे. या पुस्तकाला कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. एक लाख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. (Prof. Hemant Chopade)

प्रा. हेमंत चोपडे हे नुकतेच मागील महिन्यात स्वामी विवेकानंद आश्रम शाळा चिंध्याची वाडी जिल्हा ठाणे येथून मुख्याध्यापक या पदावरून सेवानिवृत्त झाले असून त्यांनी त्यांच्या शैक्षणिक सेवेसोबतच साहित्याची आवड जोपासत विविध साहित्यांचे लेखन केले आहे. महाराष्ट्र मिलिटरी स्कूल (Maharashtra Military School ) ठाणे च्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या गवताला फूटती भाले, आंबेडकर- सावरकर एक समांतर प्रवास, भारतरत्नांच्या देशा या पुस्तकास सुद्धा अंकुर वाड्मय पुरस्कार, हुतात्मा वीर जगदेवराव भालेराव साहित्यिक पुरस्कार, भगवान ठग तुका म्हणे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना टीचर्स इनोव्हेशन अवॉर्ड सर फाऊंडेशन पुरस्काराने (Teachers Innovation Award Sir Foundation Award) सुद्धा सन्मानित करण्यात आलेले आहे. या शिवाय नारळापासून विविध शिल्प बनवणे, ओरिगामी, विविध वाद्य वाजवणे, विविध विषयावर व्याख्याने देणे यात सुद्धा त्यांचा हातखंडा आहे. वाचनकलेचे शास्त्र व वैदिक गणित (Vedic Mathematics) ही पुस्तके मागील महिन्यात प्रकाशित झालेली आहेत. (Prof. Hemant Chopade)

शाळेतील सहकाऱ्यांनी दिलेल्या प्रोत्सहनातून पुस्तक लिखाण

M.Sc गणित, B.Sc गणित शिक्षक म्हणून मी बरेच वर्ष कामे केले. वेगवेगळ्या विषयांवर याआधी पुस्तके लिहण्याचा मला अनुभव होता. मात्र सहकाऱ्यांनी दिलेल्या प्रोत्साहनातून ‘शून्य: एक अनंत प्रवास’ या पुस्तकाचे माझ्या हातून लिखाण झाले. त्यानिमित्ताने शुन्याचे गुपित मला कळले आणि तेच या पुस्तकाच्या रूपाने वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. भविष्यात प्रात्यक्षिकातून गणित, ओरिगामीतून भूमितीय संकल्पना, पाणीकोश यासंदर्भात काम करणार आहे. तरी शासनाकडून मला मिळालेला पुरस्कार माझ्या लेखन प्रवासाला प्रेरणा देणारा ठरेल, हे निश्चित. – प्रा. हेमंत चोपडे, लेखक

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.