भारतीय रेल्वेने डिजिटल इंडिया उपक्रमाला चालना देण्यासाठी, रेल्वे स्थानकांवरील खानपान सेवा केंद्रावर खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठी डिजिटल प्रक्रियेने विक्री करण्यास प्रोत्साहन दिले आहे. तसेच रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी ई-कॅटरिंग सेवा सुरू केली आहे. याअंतर्गत प्रवासी प्रवासादरम्यान आपल्या जेवणाची आगाऊ नोंदणी करू शकतात.
( हेही वाचा : मध्य रेल्वेत वर्षभरात २३.२० लाख विनातिकीट प्रवासी, किती महसूल झाला जमा?)
डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन
रेल्वेच्या 8 हजार 878 केंद्रांवर डिजिटल व्यवहाराची सुविधा उपलब्ध आहे. पीओएस म्हणजेच पॉस यंत्रे (डिजिटल व्यवहार करण्यासाठी मशिन) रेल्वेने खानपान केंद्रांना दिली आहेत. तसेच अधिकचे शुल्क आकारले जाण्याच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठीही यामध्ये सुविधा देण्यात आली आहे. सध्या 596 गाड्यांमध्ये 3081 पॉस यंत्रे उपलब्ध आहेत. रेल्वेने 4 हजार 316 कायम स्थापित केंद्रांना पॉस यंत्रे दिली आहेत. रेल्वेमधील प्रवाशांसाठी ई-कॅटरिंग सेवा सुद्धा सुरू करण्यात आली आहे.
ई-कॅटरिंग सेवेचे व्यवस्थापन आयआरसीटीसी करते. प्रवासी, ई-तिकीटाची नोंदणी करताना किंवा रेल्वेमध्ये प्रवास करताना अॅप/कॉल सेंटर/संकेतस्थळ/1323 संपर्क साधून त्यांच्या आवडीच्या भोजनाची आगाऊ नोंदणी करू शकतात. ई-कॅटरिंग सेवा सध्या 310 रेल्वे स्थानकांवर उपलब्ध आहे.
Join Our WhatsApp Community