गृहखात्याचा अजब कारभार! आधी पदोन्नती नंतर स्थगिती, 12 तासांत असे काय घडले?

127

गृहखात्याचा अजब कारभार आता पुन्हा एकदा समोर आला आहे. बुधवारी ज्या वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यातील पाच अधिका-यांच्या बदलीच्या आदेशाला अवघ्या 12 तासांमध्ये स्थगिती देण्यात आली आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये अप्पर पोलीस आयुक्तपदी नेमलेल्या अधिका-यांच्या बढतीला स्थगिती दिल्याने सध्या सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

आदेशाला स्थगिती

आदेश काढल्यानंतर स्थगिती देण्यापर्यंत अवघ्या 12 तासांत असे काय घडले की बढतीच्या आदेशाला स्थगिती द्यावी लागली. असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. पुढच्या आदेशापर्यंत या 5अधिका-यांच्या पदोन्नतीला स्थगिती दिली गेली आहे.

(हेही वाचा: लालपरी जोमाने धावू लागली हो…91 टक्के कर्मचारी कामावर रुजू ! )

या अधिका-यांची बढती स्थगित

  • पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे
  • राजेंद्र माने, उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
  • महेश पाटील, पोलीस उपायुक्त, मिरा भाईंदर
  • दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक, पालघर
  • संजय जाधव पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, पुणे

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.