सोमवारी ब्रिटनच्या संसदेत भारतातील कृषी कायद्यांच्या विषयावर चर्चा सुरु होती. त्याचे निमित्त करत खलिस्तानी चळवळीचे समर्थक असलेल्या ‘शीख फॉर जस्टीस’ या संघटनेने ब्रिटनच्या संसदेबाहेर निदर्शने केली. खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पम्मा याने ही निदर्शने आयोजित केली होती. सध्या भारतात दिल्लीच्या सीमेवर केंद्राच्या कृषी कायद्यांचा विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. तेव्हापासून पम्मा याचे चर्चेत आले आहे.
ब्रिटन सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न!
संसदेत जेव्हा या विषयावर चर्चा सुरु होती, तेव्हा संसदेच्या बाहेर खलिस्तानी समर्थकांकडून भारताच्या विरोधात घोषणा दिल्या जात होत्या, त्याच वेळी संसदेत मात्र ‘हा विषय भारताचा अंतर्गत मुद्दा आहे’, असा चर्चेचा सूर होता. मात्र त्याच वेळी भारतात शेतकऱ्यांच्या विचारस्वातंत्र्य आणि आंदोलन अधिकारावर गदा आणली जात आहे, असे आंदोलकांचे म्हणणे होते. परमजीत सिंग पम्मा याने ब्रिटन सरकारवर दबाव टाकत म्हटले कि, भारताच्या त्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनात १७०० शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाले आहेत, तर ३२५ शेतकरी यांनी आधीच जीव सोडला आहे, जे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होते. त्यामुळे ब्रिटन सरकारने व्यावसायिक संबंध बाजूला ठेवून भारत सरकारवर दबाव टाकावा!, अशी मागणी केली.
(हेही वाचा : अंबानींच्या घराजवळ फिरणारा पीपीई किटमधील ‘तो’ संशयित कोण? )
खलिस्तान्यांकडून विदेशात भारताची बदनामी!
सध्या खलिस्तानी यांचे प्राबल्य असलेल्या कॅनडा, ब्रिटन, अमेरिका या ठिकाणी खलिस्तानी आता संधी मिळताच शेतकरी आंदोलनाच्या नावाने भारताची बदनामी करत आहेत. भारतातील शेतकरी आंदोलनाला खलिस्तान्यांनी हायजॅक केले आहे. त्यामुळे २६ जानेवारी रोजी दिल्लीतही लाल किल्ल्यावर जे हिंसक आंदोलन झाले त्यावर खलिस्तान्यांनी नियंत्रण मिळवले होते. पाकिस्तान यासाठी खलिस्तान चळवळीला साहाय्य करत असून पंजाब प्रांत भारतापासून वेगळा करण्याचा कट खलिस्तान्यांनी रचला आहे. त्यासाठी त्यांनी शेतकरी आंदोलनाचा हत्यार म्हणून वापर सुरु केला आहे.