अभिमानास्पद! भारताच्या The Elephant Whisperers ने पटकावला ऑस्कर

ऑस्कर 2023 मध्ये (OScars 2023) भारताच्या ‘द एलिफंट विस्परर्स’ या माहितीपटाने बाजी मारली आहे. या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट डाॅक्युमेंट्री शाॅर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे.

‘द एलिफंट विस्परर्स’ हा नेटफ्लिक्सवरचा एक माहितीपट आहे. या माहितीपटाला ऑस्कर 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट डाॅक्युमेंट्री शाॅर्ट फिल्म या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळाले होते. या माहितीपटात तामिळनाडूमधील मुदुमलाई व्याघ्न प्रकल्पातील एका कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. तामिळनाडूमधील एक कुटुंब बेबंद हत्तींना दत्तक घेते आणि त्यांचे कसे संगोपन करते यावर आधारित हा माहितीपट आहे.

( हेही वाचा: सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या नादात ‘या’ मुलाने आपला जीव धोक्यात घातला )

ऑस्करच्या शर्यतीतून भारताची ‘All That Breathes’ बाहेर

ऑस्करच्या शर्यतीतून भारताचा ‘ऑल दॅट ब्रीथ्स’ हा माहितीपट बाहेर पडला आहे. ऑस्कर पुरस्कार डाॅक्युमेंट्री फीटर फिल्म या श्रेणीत नैवेल्नी ने ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरले. या श्रेणीत ऑल दॅट ब्रीथ्स या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळाले होते. मात्र, या चित्रपटाला पुरस्कार मिळवण्यात अपयश आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here