लाचखोरीची रक्कम घेऊन पळाला पोलिस अधिकारी! कसा ते वाचा…

156

अँटी करप्शन ब्युरोने लावलेल्या सापळ्यातून मुंबई पोलीस दलाचा एक पोलीस उपनिरीक्षक लाचेची रक्कम घेऊन पळाल्याची घटना साकीनाका पोलीस ठाण्याच्या आवारात घडली. या लाचखोर पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

१० हजारांची मागणी

प्रविणकुमार पवार असे या पोलीस सब इन्स्पेक्टरचे नाव आहे. प्रवीणकुमार हे साकीनाका पोलीस ठाण्यात कार्यरत होते, २१ फेब्रुवारी रोजी प्रविणकुमार हे रात्रपाळीला ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्यावर होते. त्यादरम्यान साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या इसमाची तक्रार लिहून न घेता रात्रभर त्याला आणि त्याच्या मुलाला पोलीस ठाण्यात बसवून ठेवले, व मुलाच्या हातातील मोबाईल फोन घेऊन फोन परत पाहिजे असल्यास प्रविणकुमार याने १० हजार रुपयांची मागणी केली.

( हेही वाचा : फेरीवाले वाऱ्यावर आणि महापालिका धावते ‘फूड ऑन व्हिल्स’च्या मागे! )

गुन्हा दाखल

तडजोडीत ही रक्कम १० हजारावरून साडे तीन हजार करण्यात आली. या दरम्यान तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरो येथे फोन करून तक्रार दाखल केली असता अँटी करप्शन ब्युरोने साकीनाका परिसरात सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारत असताना अँटी करप्शनचा ट्रॅप लागला असल्याचे कळताच प्रविणकुमार याने लाचेची रक्कम घेऊन तेथून धूम ठोकली. याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरोने प्रविणकुमार पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती एसीबीने दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.