Public Protest At Bhagur: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्या खासदार जलील याचा भगूर येथे जाहीर निषेध

सूर्यासारख्या तेजस्वी असलेल्या महापुरुषांच्या चारित्र्यावर बोलण्याआधी स्वतःची पात्रता लक्षात घेणे आवश्यक आहे, मात्र खासदार जलील यांनी आपली वैचारिक दिवाळखोरी दर्शवली आहे.

342
Public Protest At Bhagur: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्या खासदार जलील याचा भगूर येथे जाहीर निषेध
Public Protest At Bhagur: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्या खासदार जलील याचा भगूर येथे जाहीर निषेध

एम.आय.एम.चा खासदार इम्तियाज जलील याने स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल ( Swatantryaveer Savarkar) अनुद्गार काढून स्वातंत्र्यवीर सावरकरांचाच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राचा अवमान केलेला आहे. जलील याने सावरकरांच्या जन्मगावी भगूरला येऊन सावरकर घराणे परंपरागत जहागीरदार होते व स्वातंत्र्य चळवळीपायी त्यांनी सर्व संपत्तीवर लाथ मारली. हा इतिहास माहिती करून घ्यावा, असे म्हटले आहे.

सूर्यासारख्या तेजस्वी असलेल्या महापुरुषांच्या चारित्र्यावर बोलण्याआधी स्वतःची पात्रता लक्षात घेणे आवश्यक आहे, मात्र खासदार जलील यांनी आपली वैचारिक दिवाळखोरी दर्शवली आहे. त्यांचा भगूरच्या क्रांतीभूमीत भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समुहाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, कोलू ओढला. त्याचबरोबर असंख्य क्रांतिकारकांनीही अंदमानात यमयातना भोगल्या. वीर सावरकर यांनी केलेले सुटकेचे अर्ज कधीच लपवून ठेवले नाहीत. कारागृहातून कुठल्याही प्रकारे सुटका करून घेऊन आपले कार्य चालू ठेवणे, ही केवळ वीर सावरकरच नव्हे, तर सर्वच क्रांतिकारकांची रणनीती होती. त्यांच्याप्रमाणे सगळ्यांनीच सरकारी अटी मान्य करून सुटका करून घेतली व पुढे कामही सुरू ठेवले.

(हेही वाचा –Karnataka: कर्नाटकात १०८ फूट उंच ‘हनुमान ध्वजा’वरून वाद, सर्व जिल्ह्यांत आंदोलन करण्याचा भाजप नेत्यांचा इशारा )

स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानात असतानाच त्यांचा युरोपमधील क्रांतिकारकांशी संपर्क असल्याचा ब्रिटिश गुप्तचर खात्याचा अहवाल आहे. तत्कालीन गृहमंत्री सर रेजिनॉल्ड क्रेडॉक यांनी सावरकरांच्या अर्जात कुठलाही खेद अथवा खंत नसल्याचे नोंदवत सावरकर अत्यंत धोकादायक कैदी असल्यामुळे त्यांना अंदमानात डांबून ठेवणे भाग असल्याचे म्हटले आहे. ही सर्व कागदपत्रे मुंबईच्या स्मारकात उपलब्ध आहेत. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करण्यापेक्षा त्यांचा अगोदर अभ्यास करावा म्हणजे सावरकर समजतील, असे मनोज कुवर यांनी सांगितले.

यावेळी समूहाचे योगेश बुरके, प्रशांत लोया, आकाश नेहेरे, सुनिल जोरे, संभाजी देशमुख, कैलास भोर, प्रविण वाघ, संतोष मोजाड, भूपेश जोशी, निलेश हासे, संतोष जाधव, मधुकर कापसे, पांडुरंग आंबेकर, भाऊसाहेब ससाणे, चव्हाण सर आदि भगूरकर उपस्थित होते.

हेही पहा – 

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.