सार्वजनिक क्षेत्रातील दोन बॅंकाच्या खासगीकरणासाठी गतीने पावले टाकण्यास केंद्र सरकाराने सुरुवात केली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये या संदर्भातील निर्णय होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बॅक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बॅंकेचे खासगीकरण केले जाणार आहे. सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया सहाशे शाखा बंद करण्याच्या विचारात आहे, मात्र याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
खासगीकरणाची अशी असते प्रक्रिया
निर्गुतवणूक प्रक्रियेचा एक भाग म्हणून कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखालील सचिवांचा मुख्य गट त्याच्या मंजुरीसाठी पर्यायी यंत्रणेकडे आपल्या शिफारशी पाठवतो. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळ त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करते.
( हेही वाचा: ही माघार नाही हा माझा स्वाभिमान आहे; संभाजीराजेंच्या पत्रकार परिषदेतील हे आहेत महत्त्वाचे मुद्दे )
भारत पेट्रोलियमच्या विक्रीची प्रक्रिया सुरु
- भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेडच्या विक्रीसाठीही प्रक्रिया सुरु असून, त्यासाठी नव्याने निविदा मागवण्यात येणार आहेत.
- सरकारने बीपीसीएलमधील आपला संपूर्ण 52.98 टक्के हिस्सा विकण्याची योजना तयार केली आहे.