Public Sector Undertaking : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी म्हणजे नेमकं काय? ती कशी काम करते? 

Public Sector Undertaking : देशाच्या विकासात सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या मोठी भूमिका बजावत असतात

84
Public Sector Undertaking : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी म्हणजे नेमकं काय? ती कशी काम करते? 
Public Sector Undertaking : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी म्हणजे नेमकं काय? ती कशी काम करते? 
  • ऋजुता लुकतुके

देशाच्या आर्थिक विकासात ऊर्जा, इंधन, सार्वजनिक वाहतूक व इतर पायाभूत सुविधा विकास हा खूप महत्त्वाचा असतो. अशा प्रकल्पांमुळेच उद्योगांना आधार मिळतो. या गोष्टी उद्योगाचा पाया आहेत. पण, त्याचबरोबर या सुविधांची उपलब्धता हाच मूळात एक उद्योग आहे. कारण, इंधन विकत घ्यावं लागतं, तेव्हा खाजगी कंपन्या ते वापरून आपला माल बनवू शकतील. उद्योग जगतासाठी कळीचा मुद्दा असलेल्या अशा गोष्टीचं उत्पादन आणि वितरण तसंच त्यांची किंमत ठरवणं हे बहुतेक वेळा सरकार आपल्या हातात घेतं. पण, असे उद्योग हे सार्वजनिक हिताचे राहावेत यासाठी सरकार आपल्या मालकीची कंपनी स्थापन करून इंधन, ऊर्जा यांचं उत्पादन, वितरण आणि किंमत ठरवण्याचे अधिकार आपल्याकडेच ठेवणं पसंत करतं. (Public Sector Undertaking)

(हेही वाचा- Mumbai-Goa Highway गणेशोत्सवापूर्वी खड्डे मुक्त होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिल्या सूचना)

अशा कॉर्पोरेशन कंपन्यांना सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या म्हटलं जातं. असा कंपन्यांमध्ये किमान ५० टक्के मालकी ही केंद्र किंवा राज्यसरकारची असते. काहीवेळा दोन्ही सरकारं मिळून अशा कंपन्या चालवतात. अर्थव्यवस्थेतील आर्थिक असमानता आणि सर्व प्रांताचा नियमित विकास करण्याच्या दृष्टीने कळीचे असलेले उद्योग खासकरून सार्वजनिक क्षेत्राद्वारे चालवले जातात. (Public Sector Undertaking)

इंधन आणि ऊर्जेबरोबरच जलसिंचन, रासायनिक खतं, दूरसंचार, अवजड उद्योग या क्षेत्रातील बहुतेक कंपन्या या सरकारी मालकीच्या आहेत. (Public Sector Undertaking)

(हेही वाचा- Thane – Borivali Subway मार्गाच्या कामात ठाणे महापालिकेचे सर्वतोपरी सहकार्य)

आर्थिक विकासाची काही उद्दिष्टं साध्य करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या महत्त्वाची भूमिका बजावता. समाजातील सर्व स्तरावरील लोकांचा आर्थिक विकास, पायाभूत सुविधांचा विकास, अवजड उद्योगांची निर्मिती, वीज, पाणी वितरण असा मूलभूत सुविधांचं नियमन, सरकारला महसूल मिळवून देणं, नोकऱ्यांची निर्मिती, संतुलित विकास आणि समाज कल्याण साध्य करणं यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि देशाच्या आर्थिक विकासात त्या महत्त्वाचं योगदान बजावतात.  (Public Sector Undertaking)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.