Hindu Calendar : भारतातील पहिल्या हिंदू दिनदर्शिकेचे प्रकाशन

कुर्ला पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी 'उत्सव हिंदुत्वाचा, उत्सव कुर्ल्याचा' हा दिनदर्शिकेचा दिमाखदार प्रकाशन सोहळा पार पडला.

233

हिंदूंना हिंदू वर्षाचे महिने, तिथी, सण यांची माहिती व्हावी तसेच या त्यांचे महत्व लक्षात यावे यासाठी ‘हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कुर्ला (पश्चिम)’ यांच्या वतीने भारतात पहिल्यांदाच हिंदू मासांच्या अनुसार दिनदर्शिका (Hindu Calendar) तयार करण्यात आली असून २३ मार्चला कुर्ला पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी ‘उत्सव हिंदुत्वाचा, उत्सव कुर्ल्याचा’ हा दिनदर्शिकेचा दिमाखदार प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्याला भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

hindu 3

हिंदू दिनदर्शिकेविषयी(Hindu Calendar) बोलताना प्रा. शेवडे गुरुजी म्हणाले कि, प्रचलित केलेंडर हीना केवळ कालगणनेसाठी तयार करण्यात येत असून हिंदू पंचांग हे कालयोजनेसाठी आखले जाते. प्रचलित कॅलेंडरमध्ये वर्षाचे ३६५ दिवस १२ महिन्यांत मांडण्यासाठी काही महिने ३० तर काही महिने ३१ दिवसांचे करण्यात आले आहेत, ज्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. हिंदू मासात मात्र साधारणतः ३० दिवस असतात. यातील प्रत्येक दिवसाचे स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि महत्व असते. हिंदू कालयोजनेनुसार सिद्ध करण्यात आलेली दिनदर्शिका (Hindu Calendar) ही हिंदूंसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.

(हेही वाचा Kunal Kamra च्या विडंबन गीतावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले , “… त्यामुळे मी काही रिॲक्ट झालो नाही”)

कार्यक्रमाचा आरंभ दीप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सर्वेश्वर नगरचे संघचालक प्रभाकर परांजपे उपस्थित होते. लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या या दिनदर्शिकेकरिता (Hindu Calendar) जाहिरात आणि अर्थसहाय्य करणाऱ्या दात्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. देशभरात नावलौकिक कमावलेल्या गोरखनाथ महिला गोविंदा पथक या देशातील पहिल्या महिला गोविंदा पथकाचाही यावेळी सत्कार करण्यात आला. हिंदु मासांच्या वैशिष्ट्यपूर्ण नावांची रचना करून व्यासपीठाजवळ भव्य रांगोळी रेखाटण्यात आली होती.. कार्यक्रमाच्या आरंभी राष्ट्र आणि धर्म यांवरील गीतांचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचा आरंभ ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने आणि समारोप संपूर्ण ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताने करण्यात आला.

दरवर्षी येणारे सण ख्रिस्ती कॅलेंडरप्रमाणे मागेपुढे होत असतात यामध्ये चूक आपल्या सणांची नसून आपल्या सणांनाच आपण चुकीच्या कॅलेंडरमध्ये गुंतवले आहे त्यामुळे आताच्या पिढीला हिंदू महिन्यांची नावेसुद्धा माहित नाहीत. निदान पुढच्या पिढीला हिंदू महिने, तिथी आणि तिथीनुसार येणारे प्रत्येक सण कोणत्या हिंदू मासात येतात हे कळावे यासाठी यंदा पहिल्यांदाच हिंदू दिनदर्शिकेची संकल्पना राबवण्यात आली असून ही दिनदर्शिका हिंदू नववर्षारंभाच्या (Hindu Calendar) निमित्ताने अधिकाधिक घरांत पोहचवावी असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कुर्ला (पश्चिम)चे कार्यवाहक किरण दामले यांनी यावेळी केले. सर्वसामान्य लोकांना सहजपणे विकत घेता यावी यासाठी दिनदर्शिकेचे स्वागतमूल्य केवळ २० रु. ठेवण्यात आले असून ज्यांना दिनदर्शिका हव्या आहेत त्यांनी ९०८२४३६५११ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.