धक्कादायक: पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांच्या पत्नींना पोलिसांची मारहाण

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना भेटण्यासाठी जाणाऱ्या वीरपत्नींना पोलिसांनी मारहाण केल्याची लाजीरवाणी घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, देशात संतापाची लाट उसळली आहे.

जम्मू-काश्मिरातील पुलवामा येथे झालेल्या जिहादी-दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या वीरपत्नींना मदत देण्याचे राजस्थान सरकारने आश्वासन दिले होते. मात्र, सरकारने अद्यापही आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे हुतात्मा जवानांच्या पत्नी गेल्या दोन दिवसांपासून जयपूरमध्ये आंदोलन करीत आहेत. परंतु, त्यांच्या आंदोलनाकडे राजस्थान सरकारने कानाडोळा केला. त्यामुळे आंदोलनकर्त्या जवानांच्या पत्नी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना भेटण्यासाठी जात होत्या. तेव्हा पोलिसांनी त्यांना मारहाण केल्याची लाजीरवाणी घटना घडली आहे. हुतात्मा जवानांच्या पत्नींना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. देशभरातून सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे. तसेच भाजपचे राज्यसभा खासदार किरोडी लाल मीणा यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत राजस्थान सरकारने शहीद जवानांच्या पत्नींचा अपमान केल्याचे म्हटले आहे.

( हेही वाचा: ..नाहीतर उद्धवजी तुम्ही माझ्या घरी भांडी घासायला याल का?; रामदास कदमांचा खोचक सवाल )

मारहाणीत महिला जखमी

पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी 2019 रोजी जिहादी दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले. त्यानंतर राजस्थान सरकारने हुतात्म्यांच्या पत्नींना मदत देण्याचे आश्वासन दिले. मात्र, सरकारने अद्यापही आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. जवानांच्या पत्नींनी राज्यपाल कलराज मिश्रा यांच्याकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली. तसेच जयपूरमध्ये आंदोलन सुरू केले. दरम्यान, आंदोलनकर्त्या जवानांच्या पत्नी मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांना भेटण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना मारहाण केली आहे. या मारहाणीत एक महिला जखमी झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here