भरधाव ट्रक हाॅटेलमध्ये घुसला; महिलेचा जागीच मृत्यू, तर तीन जखमी

156

पुणे चौफुल्याकडून भरधाव वेगाने आलेला मालवाहतूक ट्रक डायमंड हाॅटेलमध्ये घुसल्याने, एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाल्याची घटना बारामती तालुक्यातील सुपे मोरगाव रस्त्यावरील सोंडवळण परिसरात रविवारी रात्री दहाच्या दरम्यान घडली.

महिला जागीच ठार, तर तीन जण जखमी

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युनूस इब्राहीम काझी यांनी यासंदर्भात पोलिसांत फिर्याद दिली. भरधाव वेगातील ट्रक हाॅटेलमध्ये घुसल्याने, रुक्साना दिलावर काझी या महिलेचा जागीच मृ्त्यू झाला, तर डायमंड हाॅटेलचे मालक दिलावर इस्माईल काझी, मुलगा सोहेल दिलावर काझी, तर मुजाहिद अहमद सय्यद असे तीन जण जखमी झाले आहेत.

( हेही वाचा: स्कूल बसमध्ये जीपीआरएस बसवणे बंधनकारक )

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

भरधाव ट्रक हाॅटेलमध्ये घुसला ही घटना एवढी भयानक होती की, हाॅटेलमध्ये घुसलेल्या ट्रकला क्रेन आणि जेसीबीच्या सहाय्याने उचलण्याकरता दीड तासांचा वेळ गेला. ट्रक उचलला गेल्यानंतर, त्याखालून महिलेला काढण्यात आले. सुपे येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल केले व पुढील उपचारासाठी नेत असताना, रस्त्यातच मृत्यू झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.