शिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर सहा जखमी

98

पुण्यात एसटी महामंडळाच्या शिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर चालक, वाहक आणि सहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संजय एकनाथ भायदे असे मृत प्रवाशाचे नाव आहे. हा अपघात एवढा भीषण होता की धडकेत कंटेनर आणि शिवशाही बसच्या पुढील भागांचा अक्षरश: चक्काचूर झाला.

पुणे- सासवड रस्त्यावर असलेल्या उरळी गावालगत रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. इथून जवळ असलेल्या गोडाऊनमधून निघालेला कंटनेर सासवडहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या पंढरपूर- पुणे एसटीच्या आडवा आला. या अपघातात चालक, वाहक आणि त्यामधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

( हेही वाचा: लव्ह जिहाद : हिंदूंची वंशवृद्धी थांबवण्याचे कारस्थान! )

असा झाला अपघात

शिवशाही बस पंढरपूरहून प्रवाशांना घेऊन पुण्याच्या दिशेने जात होती. ही बस पुणे- सासवड रस्त्यावर आली असताना, उरळी फाट्याजवळ असलेल्या गोदामातून निघालेला कंटेनर शिवशाही बसच्यासमोर आला आणि जोरदार धडक झाली. अपघातात बस आणि कंटेनरच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. ज्यामुळे एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर चालक, वाहक आणि प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थाळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.