आकाशवाणी पुणे केंद्रातील (Pune Akashvani) प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय प्रसारभारतीने घेतला आहे. त्यामुळे १९ जूनपासून पुणे वृत्त विभागामार्फत प्रसारित होणारे आकाशवाणीवरील प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर वृत्त विभागाकडे सोपवण्यात आले आहे. आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना स्वातंत्र्याच्या ५-६ वर्षानंतर म्हणजेच १९५३ रोजी झाली. गेल्या ४० वर्षापासून या केंद्रावरुन नियमित बातमीपत्र प्रसारित होत होते.
आकाशवाणीवरील पुणे (Pune Akashvani) प्रादेशिक वृत्त विभागाकडून सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी होणाऱ्या, एफएम वाहिनीवरील सकाळी ८, १०.५८ आणि ११.५८ वाजता होणाऱ्या बातम्या तसेच संध्याकाळी ६ वाजेच्या बातम्या आता बंद होणार आहेत. त्याचप्रमाणे सकाळी ८.३० वाजता होणाऱ्या राष्ट्रीय बातम्यांचे प्रसारणही बंद होणार आहे. या सर्व बातम्या आता औरंगाबाद केंद्राहून दिल्या जाण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – Monsoon : अखेर ‘या’ तारखेपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होणार)
पुण्यातील प्रादेशिक वृत्त (Pune Akashvani) विभाग बंद होणार असल्यामुळे या बातम्या तेथे पोहोचणार कशा, तसेच पुण्यातील घडामोडींची दखल छत्रपती संभाजीनगरहून कशी घेतली जाणार याबाबत सध्या तरी अनिश्चितता आहे. देशात आकाशवाणीच्या पुणे केंद्राला सर्वाधिक श्रोते आहेत. सुमारे 24 लाख श्रोते नियमितपणे कार्यक्रम ऐकतात. पुण्यातील केंद्राची स्थापना 1953 मध्ये झाली असून, येथून गेल्या 40 वर्षांपासून बातम्या प्रसारित होत होत्या.
तोकड्या मनुष्यबळावर कामकाज
आकाशवाणी पुणे (Pune Akashvani) केंद्राचं काम सध्या तोकड्या मनुष्यबळावर चालत होतं. केंद्राचा प्रभारी माहिती अधिकारी, एकमेव वृत्तनिवेदक आणि हंगामी वृत्तसंपादक यांच्या नेतृत्त्वात हंगामी वार्ताहरांच्या जोरावर आकाशवाणी पुणे केंद्राचं बातमीपत्र सुरु होतं. मनुष्यबळ तोकडं असलं तरी बातम्यांची कमतरता इथे कधीच जाणवली नाही. मात्र आता हे केंद्र कायमचं बंद होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community