पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या बातम्यांची निर्मिती आणि प्रसारण छत्रपती संभाजीनगरला हालवण्याचा निर्णय केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने गुरुवारी स्थगित केला. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच पुणे आकाशवाणीवरुनच बातम्या प्रसारित होतील, असे नवे आदेश मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले आहेत. दरम्यान आकाशवाणी पुणे केंद्रातील वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर प्रसारभारतीने मागे घेतला. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार मानले आहेत.
(हेही वाचा – India : भारतातील ‘या’ बर्म्युडा ट्रॅंगलबद्दल तुम्हाला माहिती आहे का? कधीही इथे जाऊ नका)
प्रसार भारतीने काढलेल्या नव्या आदेशात ३ बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार, १३ जून २०२३ रोजी काढलेल्या आदेशानुसार आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन सकाळी ७.१० वाजता, ८ वाजता होणारे दोन बुलेटिन. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता आणि १०.५८ वाजता एफएमवरुन होणारं बुलेटिन तसेच संध्याकाळी ६ वाजता होणारं (जिल्हा बातमीपत्र) यांची निर्मिती आणि प्रसारण पुढील आदेश येईपर्यंत पुणे केंद्रावरुनच होईल. त्याचबरोबर पुणे प्रादेशिक वृत्त विभागातील नियमित, कंत्राटी आणि हंगामी कर्मचाऱ्यांचं कामही पुढील आदेश येईपर्यंत कायम राहिल असंही या नव्या आदेशात म्हटलं आहे. वृत्त विभागाच्या महासंचालकांच्या मंजुरीनंतर हे आदेश काढण्यात आल्याचे प्रसार भारतीच्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान खासदार प्रकाश जावडेकर आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी अनुराग ठाकूर यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community