धक्कादायक! आई वडिलांच्या भांडणात आठ वर्षांच्या मुलीला लागली बंदुकीची गोळी

136

आई वडिलांचे भांडण सुरु असताना आईवर पिस्तूल रोखलेले पाहून पप्पा आईला मारु नका, असे म्हणणा-या आठ वर्षीय राजनंदिनीवर तिच्या वडीलांनी गोळी झाडल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील न-हे आंबेगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राजनंदिनी पांडुरंग उभे असे आठ वर्षीय जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. मुलीवर गोळी झाडल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडील पांडुरंग उभे यास अटक केली आहे.

सिंहगड पोलीस स्टेशनचे शैलेश संखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, न-हे येथील हेरंब हाइट्समध्ये आरोपी पांडुरंग उभे हे पत्नी आणि मुली यांच्यासोबत वास्तव्य करतात. आरोपी पांडुरंग हे बांधकाम व्यावसायिक असून मागील काही दिवसांपासून व्यवसायात काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यातच आोरपीला दारुचे व्यवसन असल्याने तो दररोज दारु पिऊन घरी आल्यावर पत्नीसोबत भांडण करायचा. अशाच प्रकारचे भांडण शुक्रवारी रात्रीदेखील झाले.

( हेही वाचा: तब्बल ३६ तासांनी मुंबई-गोवा महामार्ग सुरू; अपघातग्रस्त टॅंकरमधील गॅस काढण्यात यश )

आरोपी अटकेत 

भांडण विकोपाला गेल्यामुळे आरोपीने त्याच्याजवळ असलेले पिस्तूल आपल्या पत्नीवर रोखली. हे आठ वर्षीय राजनंदिनी हिने पहिले आणि दोघांच्या भांडणात ती पडली. पप्पा आईला मारु नका, असे म्हणणा-या राजनंदिनीवर आरोपी पित्याने गोळी झाडली. या घटनेत राजनंदिनी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी पांडुरंग उभे याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.