पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात बाॅम्बसदृश्य वस्तू सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी तत्काळ तपास सुरु केला आहे. टणू गावात शेतक-याला ही बाॅम्बसदृश्य वस्तू आढळून आली आहे.
इंदापूर तालुक्यातील टणू गावात एका शेतक-याला आपल्या जनावरांच्या मुक्त संचार गोठ्यामध्ये बाॅम्बसदृश्य वस्तू आढळली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. टणू गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असणा-या दत्तात्रय मोहिते यांच्या जनावरांच्या मुक्त संचार गोठ्यामध्ये ही बाॅम्बसदृश्य वस्तू आढळून आली. त्यानंतर या शेतक-याने पोलिसांच्या 112 ह्या हेल्पलाईनला या संदर्भात माहिती दिली.
( हेही वाचा: पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 5 महिलांचा मृत्यू )
घटनास्थळी बाॅम्ब शोध व नाश पथक दाखल
माहिती मिळताच इंदापूर पोलीस आणि बाॅम्ब शोधक पथक BDD पथक या ठिकाणी दाखल झाले आहे. या श्वान पथकाने ही वस्तू डिटेक्ट केली असून, या ठिकाणी बाॅम्ब शोध व नाश पथक दाखल झाले आहे. त्यानंतर आता ही वस्तू खरचं बाॅम्ब आहे का ?की अन्य काही आहे, याबाबत उलगडा होणार आहे.
Join Our WhatsApp Community