अहमदनगरमधील एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या नव्हे तर ही हत्याच असल्याची माहिती समोर आली आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या हत्यांच्या आरोपात चार जणांना अटक करण्यात आली आहे. कुटुंबियांच्या नातेवाईकांनीही हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. विशेष म्हणजे याप्रकरणी आरोपींनी या घटनेची कबुलीही दिली आहे. आरोपींच्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हे हत्याकांड घडवल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच पोलीस अधिकारी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहेत.
( हेही वाचा: उद्धव ठाकरे, हिंदुत्व म्हणजे लोकशाही; हुकुमशाही तर महाविकास आघाडीच्या काळात होती )
…म्हणून 7 जणांची केली हत्या
दौंड तालुक्यातील पारगाव येथील भीमा नदी पात्रात एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या नसून हत्या झाल्याचे कारण उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून, त्यांनी या भयंकर कृत्याची कबुलीही दिली आहे. आरोपीच्या एका भावाचा काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता. हा अपघात सदर कुटुंबियांनी अंधश्रद्धा आणि करणीच्या माध्यमातून केल्याचा आरोप आरोपींनी केला आहे. त्याच रागातून संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती समोर आली आहे.