पुण्यात पुन्हा भडकले CNG गॅसचे दर, मध्यरात्रीपासून नवे दर लागू

पुणेकरांच्या खिशाला आता कात्री लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यात बुधवार, आजपासून सीएनजी गॅस दरास वाढ झाली आहे. पुण्यात सीएनजी दरात प्रति किलो मागे एक रूपयांची दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना पुण्यात आता सीएनजी ९२ रूपये प्रति किलो या दराने मिळणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने मध्यरात्रीपासून हे दर लागू केले आहेत.

(हेही वाचा – टिटवाळा स्टेशन परिसरात संतप्त प्रवाशांनी रोखली लोकल ट्रेन! काय आहे कारण?)

गेल्या महिन्यातच सीएनजी गॅसच्या दरात चार रूपयांची दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एक रूपयांची दरवाढ करण्यात आल्याने दोन महिन्यात पाच रूपयांनी सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे.

डिझेलच्या दराने सीएनजी

सीएनजीच्या वाढलेल्या दराने डिझेलचा दर गाठला आहे. डिझेल आणि सीएनजी गॅसच्या दरात फक्त ३६ पैशांचा फरक राहिला आहे. पुण्यात पेट्रोल १०५.५४ रूपये प्रति लिटर इतका आहे, तर डिझेलचा दर ९२.३६ रूपये प्रति लिटर इतका आहे.तर मुंबईतही नोव्हेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात मुंबई महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी, पीएनजी गॅसच्या दरात वाढ केली होती. मुंबईत सीएनजीचा दर ८९.५० रूपये प्रति किलो आणि पीएनजी ५४ रूपये प्रति किलोची दरवाढ करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here