राज्यातील ‘त्या’ ४ महिला आमदारांची फसवणूक करणाऱ्या तरूणाला बेड्या

राज्यातील भाजपच्या चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वी समोर आला होता. यामध्ये भाजप आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या चार महिला आमदारांची फसवणूक झाली होती. दरम्यान, याप्रकरणी पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुणे पोलीस आरोपीचा शोध घेत होते. अखेर या पोलिसांच्या प्रयत्नाना यश आले आहे. या चार महिलांची फसवणूक करणारा तरूण मुकेश राठोडला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

(हेही वाचा – युद्धनौका INS विक्रमादित्य जहाजाला आग, बोर्ड ऑफ इन्क्वायरीचे आदेश)

काय होते प्रकरण

आई आजारी असल्याचे कारण देत एका तरूणाने महिला आमदरांकडून पैस उकळल्याचे समोर आले. मेडिकल आणि हॉस्पिटलचं बिल देण्यासाठी तरूणाने आमदारांकडे मदतीची याचना केली होती. या आमदारांनाही तरूणावर विश्वास ठेवत त्याला मदत करण्यासाठी पैशांची मदत केली. मात्र आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरूणाविरोधात आमदार माधुरी मिसाळ यांनी तक्रार दाखल केली. आमदार माधुरी मिसाळ यांच्या तक्रारीनंतर आर्थिक फसवणुकीचे हे प्रकरण समोर आले होते. सामाजिक बांधिकली जपत आमदारांनीही तरुणाला मदत केली. पण आपली आर्थिक फसवणूक झाली असल्याची तक्रार महिला आमदाराच्या वतीने करण्यात आली होती.

आई आजारी आहे म्हणत मागितली मदत

मुकेश राठोड असे या तरूणाचे नाव असून तो मराठवाड्याचा असल्याची माहिती आहे. आई आजारी असल्याचे सांगत मुकेश राठोडने या महिला आमदारांकडे आर्थिक मदत मागितली होती. आमदारांनीही ही मदत ऑनलाईन माध्यमातून मुकेश राठोडला पाठवली. मात्र नंतर तो कॉल फेक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर आमदारांनी त्याच्याविरोधात बिबेवाडीत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र मुकेश राठोड फरार झाला होता. फरार झालेल्या मुकेशचा शोध पुणे पोलिसांकडून सुरू होता. अखेर त्या तरूणाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन गडाआड टाकल्याचे सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here