भररस्त्यावर धक्का देऊन तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. आपल्या सहका-यांसोबत चहा घेतल्यानंतर, संबंधित तरुणी रस्ता ओलांडत होती. त्याचवेळी एका तरुणाने तिला धक्का दिला. एवढेच नाही, तर मारहाण करुन तिचा विनयभंगदेखील केला आणि चेह-यावर अॅसिड फेकण्याची धमकी देखील या तरुणाने दिली आहे. शुक्रवारी संध्याकाळी 6 दरम्यान खराडी परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
हे आहे प्रकरण
संबंधित तरुणी ही खराडी परिसरातील एका माहिती- तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता म्हणून नोकरीस आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणी नेहमीप्रमाणे तिच्या सहका-यांसोबत चहा पिण्यासाठी कंपनीबाहेर आली होती. चहा प्यायल्यानंतर तरुणी सहका-यांसोबत रस्ता ओलांडत होती. त्याचवेळी रोहित माने या तरुणाच्या दुचाकीचा धक्का तिला लागला आणि याचा जाब विचारत असताना, रोहित मानेने तरुणीला मारहाण केली आणि भररस्त्यात तिचा विनयभंग करुन तिला ढकलून दिले.
( हेही वाचा: बाळासाहेबांच्या पश्चात मराठीला उतरती कळा; भाजप आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र )