धक्कादायक! पुण्यात गुंडाच्या समर्थकांनीच केला पोलिसांवर हल्ला!

पुण्यातील येरवडा येथील पोते वस्ती येथे सर्व धर्म समभाव सोसायटीतील नागरिकांना गुन्हेगार शक्तीसिंह बावरी आणि त्याचे साथीदार त्रास देत होते. मिळालेल्या माहितीवरुन, पोलिस त्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेले असताना, जमावाने पोलिस पथकावरच हल्ला केला. जमावाने केलेल्या हल्ल्यात एक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाल्यानंतर पोलिसांनी आत्मरक्षणार्थ हवेत गोळीबार केला. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

सर्रास गुंडागर्दी चालू होती

येरवडा येथील सर्व धर्म समभाव ही म्हाडाची सोसायटी आहे. या सोसयटीतील नागरिकांना शक्तीसिंह सुरजसिंग बावरी आणि त्याचे साथीदार त्रास देत होते. गाड्यांमधील पेट्रोल चोरणे, घराचे दरवाजे खिडक्या फोडणे, टेरेसवर परवानगी न घेता जाऊन दारु पिणे, पत्ते खेळत बसणे असे प्रकार करुन सोसायटीत तो व त्याचे साथीदार गोंधळ घालत आले आहेत. त्यामुळे या सोसायटीतील 200 घरांपैकी 179 फ्लॅटधारक सोसायटी सोडून दुसरीकडे राहत आहे. बुधवारी रात्री ख्रिश्चन समाजातील एका कुटुंबाच्या घरात शिरुन शक्तीसिंहने मारहाण केली होती. गस्तीवरील पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक युनुस शेख सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव यांना त्याची माहिती दिली.

( हेही वाचा: मुंबई खालिस्तानी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर! हाय अलर्ट जारी )

अखेर अटक

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शक्तीसिंह याला हटकले. यावेळी त्याने आपल्या समाजाला भडकावले आणि लोकांचा मोठा जमाव तयार केला. त्यांनी पोलीस निरीक्षक गाडे आणि कर्मचा-यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. हे प्रकार पाहिल्यावर पोलिसांनी हवेत गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने जमाव पांगला. त्यानंतर पोलिसांनी अधिक कुमक मागवून शक्तीसिंह याला अटक केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here