धक्कादायक! दहावीच्या निरोप समारंभातच तिच्यावर आला ‘असा’ प्रसंग…

126

पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. वडगाव शेरी परिसरात दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून वडगाव शेरी येथील हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. दहावीच्या निरोप समारंभात शाळेत विद्यार्थी आणि शिक्षिकेसमोर हा धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

( हेही वाचा : रेल्वे प्रवास करताना मिळणार कन्फर्म तिकीट! IRCTC ने सांगितला ‘हा’ मार्ग )

विद्यार्थिनी गंभीर जखमी 

मिळालेल्या माहितीनुसार , आज सकाळी वडगाव शेरी येथील इनामदार शाळेच्या आवारात आज सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. लवकरच दहावीच्या मुलांच्या ऑफलाईन परीक्षा सुरू होणार आहेत त्यामुळे शाळेत निरोप समारंभांचे कार्यक्रम सुरू आहेत. वडगाव शेरीमधल्या या शाळेत आज दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम सुरू असताना आरोपी तीक्ष्ण हत्यारासह वर्गात घुसला आणि विद्यार्थिनीवर वार केले. या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर वडगाव शेरी येथील सिटी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात मुलीच्या पोटाला आणि हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्ला करणारा आरोपी मुलीच्या परिचयातील असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

criminal

पुणे शहर पोलीस तर गजब की पुलीस है

पुणे वडगाव शेरी एका अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. मुलगी म्हणजे स्वतःची मालकी वाटावी इतपत विकृतांची मजल गेली आहे. “पुणे शहर पोलीस तर गजब की पुलीस है सत्ताधाऱ्यांच्या  बलात्कारी पिलावळीला वाचवण्यात व्यस्त..बलात्कारी मोकाट तर पिडीता बेपत्ता होताहेत” असे सांगत घडलेल्या प्रकरणाविषयी भाजप, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.