पुण्यातील औंध परिसरात पतीने पत्नी आणि ८ वर्षाच्या मुलाचा खून करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे.
( हेही वाचा : “म्हणून राज्यपालांनी ठाकरेंऐवजी एकनाथ शिंदेंना सरकार स्थापनेसाठी बोलावलं”, तुषार मेहतांचा युक्तिवाद )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती सुदिप्तो गांगुली (४४) हा हिंजवडीमध्ये टीसीएस कंपनीमध्ये कामाला होता. त्याच्या पत्नी व मुलाचे नाव अद्याप समोर आलेले नाही. सुदिप्तो गांगुली यांचा भाऊ बंगलोरला असतो त्याने त्याच्या मित्रामार्फत मिसिंगची तक्रार पोलिसांकडे दाखल केली होती. सुदिप्तो गांगुली फोन उचलत नसल्यामुळे संशय निर्माण होऊन तक्रार दाखल करण्यात आली होती.
सुदिप्तो गांगुली आयटीआय अभियंता होता. सुदिप्तोने पॉलिथिनची पिशवी तोंडाला गुंडाळून मुलगा आणि पत्नीचा खून केला. त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. औंध येथील डीपी रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.