न्यायालयात महिला वकिलांची संख्या ही कमी नाही. त्यामुळे न्यायालयात महिला वकील खटला लढवताना आपल्याला दिसतात. पण पुणे जिल्हा न्यायालयाने महिला न्यायाधीशांच्या बाबतीत एक अजब नोटीस बजावली होती. महिला वकिलांनी न्यायालयात आपले केस नीट करू नयेत, असे त्या नोटीसमध्ये म्हणण्यात आले होते. मात्र आता ही नोटीस मागे घेण्यात आली आहे.
काय आहे नोटीस?
महिला वकील न्यायालयात हजर असताना अनेकदा न्यायालयातच आपले केस नीट करत असतात. महिला वकिलांची ही कृती लक्ष विचलित करणारी असून त्यामुळे न्यायालयीन कामकाजात अडथळा येतो. म्हणून महिला वकिलांनी न्यायालयात आपले केस सावरू नये, असे पुणे जिल्हा न्यायालयाने आपल्या 20 ऑक्टोबर रोजी काढलेल्या नोटीसमध्ये म्हटले होते. या नोटीसची सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
(हेही वाचाः ‘आम्ही फोडलेल्या फटाक्यांचे ते आजही डेसिबल मोजत आहेत’, मुख्यमंत्री शिंदेंनी फोडले टीकांचे फटाके)
बार असोसिएशनचे म्हणणे काय?
याचबाबत वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी ट्वीट केले होते. महिला वकिलांकडून कोण आणि का विचलित होत आहे, असं कॅप्शन देत जयसिंह यांनी ट्वीटमध्ये न्यायालयाच्या नोटीशीचा फोटो देखील जोडला होता.
Wow now look ! Who is distracted by women advocates and why ! pic.twitter.com/XTT4iIcCbx
— Indira Jaising (@IJaising) October 23, 2022
पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. पांडुरंग थोरवे यांमी मात्र आपल्या कार्यालयाला अशी कोणतीही मिळाली नसल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे. वकिलांना देण्यात येणा-या नोटीस या बार असोसिएशनला पाठवण्यात येतात. पण आजवर अशी कोणतीही नोटीस आली नसल्याचा खुलासा थोरवे यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community