वानवडी येथे पञ्याच्या घरांना आग; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

पुण्यात गुरुवारी राञी ११:३२ वाजता अग्निशमन दलाकडे वानवडी, शिवरकर गार्डनच्या मागे शिवरकर चाळ येथे घराला आग लागल्याचे वृत्त मिळाले. त्याचवेळी प्रथम कोंढवा खुर्द अग्निशमन वाहन व बुद्रुक येथून टँकर रवाना करण्यात आले होते.

घटनास्थळी पोहोचताच सदर चाळीमधे पञ्याचे बांधकाम असलेल्या काही घरांना आग लागल्याचे दिसून येताच जवानांनी पाण्याचा मारा चोहोबाजूंनी सुरू करत घरामध्ये कोणी अडकले नसल्याची खाञी केली. आगीची तीव्रता पाहून घटनास्थळी असणा-या अग्निशमन अधिका-यांच्या मागणीनंतर दलाकडून अतिरिक्त मदत रवाना करण्यात आली होती. सदर ठिकाणी पुणे अग्निशमन दलाच्या ०४ फारयगाड्या व दोन वॉटर टँकर आणि पुणे कॅन्टोमेंट विभागाची ०१ फायरगाडी दाखल होत आग विझवण्याची कार्यवाही करण्यात आली. दलाकडून सुमारे २० मिनिटात आग आटोक्यात आणत पुढील धोका टाळण्यात आला. तसेच, आग पुर्णपणे राञी १२:३३ वाजता विझवण्यात यश आले.

आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज

अग्निशमन दलाने वेळेत घटनास्थळी पोहोचत आग विझवल्याने मोठी हानी टळली व आग इतरञ पसरली नाही. या आगीमध्ये सुदैवाने कोणीतीही जिवितहानी झाली नाही. सदर ठिकाणी आगीमध्ये एक घरगुती सिलेंडर फुटला असून एकूण ४ घरे जळाली तर ३ घरांना झळ लागली आहे. आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज असून या ठिकाणी गृहपयोगी सर्व वस्तू जळाल्याने कुटूंबाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी महावितरण विभाग व पोलिस दल दाखल झाले होते.

( हेही वाचा: पेणनजीक सापडला डमी बॉम्ब; चार तासांच्या प्रयत्नानंतर निकामी करण्यात यश )

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी समीर शेख, कैलास शिंदे वाहनचालक समीर तडवी, दिपक कचरे, संतोष गायकवाड तसेच जवान निलेश लोणकर, राहुल नलावडे, विशाल यादव, प्रकाश शेलार, जितेंद्र कुंभार, संदिप पवार यांनी सहभाग घेतला.

अग्निशमन वाहने

१) कोंढवा खुर्द
२) कोंढवा बुद्रुक
३) बी टी कवडे रोड
४) गंगाधाम
५) पुणे कॅन्टोमेंट
६) कोंढवा बुद्रुक वॉटर टँकर
७) मुख्यालय जंम्बो वॉटर टँकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here