‘फिल्मी स्टाईल’ने तलवारीने कापला केक; ‘बर्थ डे बाॅय’ला अटक

पुण्यातील काशेवाडी परिसरात फिल्मी स्टाईलने वाढदिवस साजरा करत तलवारीने केक कापून दहशत माजवण्यात आल्याची घटना घडली. दहसत माजवणा-या बर्थ डे बाॅयला पोलिसांनी अटक केली आहे.

अतिश असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1) सह 135 भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुण्यातील काशेवाडी परिसरामध्ये वाढदिवसाचा केक हत्याराने कापण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर युनिट एकने अतिशला अटक केली.

( हेही वाचा: याच वाघाने डरकाळी फोडल्यावर महाराष्ट्रात काय झालं हे सर्वांनी पहिलं; केसरकरांचा ठाकरेंना टोला )

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here