पुण्यातील कात्रज परिसर गॅस सिलिंडरच्या स्फोटांनी हादरला आहे. पुण्यातील कात्रज परिसरात मंगळवारी संध्याकाळी गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. कात्रज परिसरातील गंधर्व लॉन्स जवळ सिलिंडरचे हे स्फोट झाले असून या स्फोटांमुळे भीषण आगही लागली. स्फोट होतानाचा एक व्हिडीओ समोर आला असून ही घटना किती भीषण होती याचा अंदाज त्यातून येतो.
एकामागे एक 20 सिलिंडर स्फोटांची मालिका
या परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती देताच अग्निशमन दलाचे जवान घटानास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार, २० सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेमुळे कोणी जखमी किंवा जिवितहानी झाल्याचे अद्याप माहिती नाही. मात्र, एकामागून एक झालेल्या सिलिंडर स्फोटांच्या मालिकेच्या आवाजांमुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
या सिलिंडर स्फोटचे कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीचा थरकाप उडवणारा व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवणारा आहे. अग्निशमन दलाची सहा वाहने आणि जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. हे स्फोट इतके भीषण होते की, त्याचा आवाज तब्बल 2 किलोमीटर दूर पर्यंत ऐकू येत असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – फडणवीसांची ‘समृ्द्धी’ आता ठाकरेंना झाली प्यारी)