पुण्यात सुद्धा बुली बाई ॲप प्रकरण? वाचा काय आहे प्रकरण…

बुली बाई ॲप प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलयं आणि असाच धक्कादायक प्रकार पुण्यात घडल्याचं समोर येत आहे. पुण्यातील खडकी परिसरात देखील बुली बाईसारखे प्रकरण घडले असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. परिसरात राहणाऱ्या महिलांचे व मुलींचे फोटो काढत ते अश्लील बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी खडकी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी काही व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये एड होता. त्या ग्रुपच्या माध्यमातून हे फोटो एडिट कसे व्हायचे आणि इतर गोष्टींबद्दलची माहिती पोलिसांना मिळाली. हा तरुण कोणताच काम धंदा काहीच करत नाही, असे समोर आले आहे.

तसेच त्याचे आई-वडील मजुरी काम करतात. महागड्या मोबाईलच्या माध्यमातून आरोपी एडिटिंग करत होता. आरोपीला पोलिसांनी बुधवारी कोर्टात हजर केले त्यानंतर न्यायालयाकडून आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपीने तो राहत असलेल्या परिसरातच महिला आणि अल्पवयीन मुलींचे फोटो, व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये काढले आणि नंतर त्याला अश्लीलरित्या एडिट करत ते सोशल मीडियावर व्हायरल केलं आणि हा तरुण २०१९ पासून हे कृत्य करत असल्याचे उघड झालं आहे.

( हेही वाचा : बेस्ट गाड्यांमध्ये लस प्रमाणपत्र तपासतच नाही! कारण… )

आरोपीला अटक

त्याचबरोबर या आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल हँडसेटसह त्याने अनेक वेगळे वेगळे मोबाईल वापरल्याचे देखील उघड झाले आहे. आतापर्यंतच्या तपासात त्याने व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये १८ वर्षा खालील ४ मुलींचा, तर तीन महिलांची नावे समोर आली आहेत. या आरोपीला अटक केल्यानंतर आता कोर्टाने १५ तारखेपर्यंत पोलिस कस्टडी दिली आहे. त्याचबरोबर या आरोपी बरोबर त्याचे इतर साथी आहेत का, या दिशेनेही आता पोलिस शोध घेत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here