Pune Metro ची ट्रायल रन यशस्वी; लवकरच गरवारे ते डेक्कन आणि फुगेवाडी ते दापोडी मेट्रो धावणार

111

पुणे मेट्रोने गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रो स्टेशन आणि फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशन अशी ट्रायल रन घेतली. पुणे मेट्रोने दैनंदिन प्रवासी संख्येचा टप्पा ओलांडला, 15 ऑगस्ट 2022 रोजी 70,000 पेक्षा जास्त प्रवासी संख्या (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत) पार केली. पुणे मेट्रोचे वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक आणि पिंपरी चिंचवड महानगपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक हे विभाग 6 मार्च 2022 रोजी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या उद्घाटनानंतर कार्यान्वित करण्यात आले.

मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा

15 ऑगस्ट, आझादी का अमृत महोस्तव आणि स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने, पुणे मेट्रोने रिच 1 वरील फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशन आणि रिच 2 वरील गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रो अशी पहिली चाचणी पूर्ण करून आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. या चाचणीला मोठे यश मिळाले आणि त्यामुळे येत्या काही महिन्यांत गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनच्या पलीकडे सिव्हिल कोर्ट स्थानक आणि फुगेवाडी स्थानक येथून शिवाजीनगर मेट्रो स्टेशनकडे मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

(हेही वाचा – अनिल परबांच्या रिसॉर्टवर हातोडा पडणार? सोमय्यांनी ट्वीट करत म्हटले…)

सध्या कार्यरत असलेल्या गरवारे कॉलेज मेट्रो स्थानकापासून डेक्कन मेट्रो स्थानकापर्यंत आणि परतीच्या प्रवासाला सकाळी 10.30 वाजता सुरुवात झाली. त्याचप्रमाणे फुगेवाडी स्थानकातून ते दापोडी मेट्रो स्थानकाकडे मेट्रो त्याच वेळेस धावली. दोन्ही गाड्यांचा ट्रायल रनचा वेग 15 किमी प्रती तास इतका होता आणि तो नियोजनाप्रमाने प्रमाणे पूर्ण करण्यात आला. “आम्ही येत्या काही महिन्यांत मेट्रोचे उर्वरित मार्ग उघडण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि रिच 1 मध्ये फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशनपर्यंत आणि रिच 2 मध्ये गरवारे मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रोपर्यंत पहिली ट्रेन ट्रायल चालवली जाणार असून त्यासाठी सुरुवात झाली आहे”, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

 मेट्रोला प्रवाशांची पसंती

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने अनेक पुणेकरांनी मेट्रोने प्रवास करणे पसंत केले. पुणे मेट्रोच्या प्रवाशांनी मागील दिवसाचा विक्रम आज मोडला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 70 हजारांहून अधिक लोकांनी मेट्रोने प्रवास केला आहे. मागील दैनंदिन प्रवासी रेकॉर्ड प्रति दिन 67,280 प्रवासी होते. मोठ्या संख्येने शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, कौटुंबिक गट, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवासी यांनी मेट्रोने प्रवास करणे पसंत केले, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.