पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामासाठी ठाणे-दिवा डाऊन जलद मार्गावर 14 तासांचा पायाभूत सुविधांच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी (ता. 23) या मार्गावरुन धावणाऱ्या पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांसह इतर रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. शनिवारी मध्यरात्री दीड वाजल्यापासून रविवारी 3.20 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस रविवारी पहाटे दोन वाजल्यापासून ते ब्लॉक अवधी पूर्ण होईपर्यंत कल्याणकडे जाणाऱ्या उपनगरीय व मेल एक्स्प्रेस गाड्या मुलुंड ते कल्याणदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी सहकार्य करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.
या दोन एक्सप्रेसही रविवारी रद्द
यासह येत्या शनिवारी (दि. 22 जानेवारी) रोजी कोकण रेल्वेच्या काही गाड्या पनवेलपर्यंतच धावणार आहेत. तर, दुसऱ्या दिवशी (दि. 23 जानेवारी) काही गाड्या पनवेल येथूनच सुटणार आहेत. मध्य रेल्वेवर ठाणे आणि दिवा या दोन स्थानकांच्या दरम्यान रेल्वेमार्गाच्या सुधारणेचे काम सुरू असल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार रविवारी, 23 जानेवारी रोजी मुंबई-मडगाव आणि मडगाव-मुंबई तेजस एक्स्प्रेस गाडी रद्द करण्यात आली आहे.
(हेही वाचा -रविवारी कोकण रेल्वेच्या ‘या’ ट्रेन पनवेलवरून सुटणार…)
याबाबत कोकण रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, 23 जानेवारी रोजी सुटणारी 22119/22120 क्रमांकाची छत्रपती शिवाजी टर्मिनस एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. इतर गाड्यांमध्ये केलेला बदल असा 16346 क्रमांकाची 21 जानेवारी सुटणाऱ्या तिरुवनंतपुरम-लोकमान्य टिळक नेत्रावती एक्स्प्रेस गाडीचा प्रवास लोकमान्य टिळक टर्मिनसऐवजी पनवेल येथे समाप्त होईल. 12052 क्रमांकाची मडगाव-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेस आणि 10112 मडगाव-छत्रपती शिवाजी टर्मिनस कोकणकन्या एक्स्प्रेस या 22 जानेवारी सुटणाऱ्या दोन्ही गाड्यांचा प्रवास छत्रपती शिवाजी टर्मिनसऐवजी पनवेल येथे समाप्त होईल.
Join Our WhatsApp Community